PM मोदींचा जुना VIDEO शेअर करत राहुल गांधींची खोचक टीका
PM मोदींचा जुना VIDEO शेअर करत राहुल गांधींची खोचक टीका
पंतप्रधानांनी काही महिन्यांपूर्वी मोदींनी आपल्या निवासस्थानी व्यायाम आणि योग करतानाचे काही व्हिडीओ ट्वीट केले होते. त्याचाच संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केलीय.
नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या बजेटवर समिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भाजपने हा विकासाभुमिक बजेट असल्याचं म्हटलंय तर काँग्रेसने हा बजेट अर्थहिन असल्याची टीका केलीय. हा बजेटम्हणजे फक्त आकडेमोड असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. आपल्या टीकेची धार कमी न करता राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा जुना VIDEO शेअर करत खोचक टीका केलीय. पंतप्रधानांनी काही महिन्यांपूर्वी मोदींनी आपल्या निवासस्थानी सकाळी व्यायाम आणि योग करतानाचे काही व्हिडीओ ट्वीट केले होते. त्याचाच संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केलीय.
या VIDEOत पंतप्रधान व्यायामाचे विविध प्रकार करताना दाखविण्यात आलं होतं. तोच संदर्भ देत राहुल गांधी यांनी म्हटलंय की प्रिय, पंतप्रधानजी हा तुमचा जादुई व्यायाम असाच आणखी जास्त काळ करत राहा. तुम्हाला काय माहित? तुमच्या या व्यायामामुळे अर्थव्यवस्थेला वेगही मिळू शकतो.
अजित पवारांच्या PAच्या भावावर जीवघेणा हल्ला, शस्त्रांनी केले डोक्यात वारअर्थमंत्री काय म्हणाल्या?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आम्ही रोजगार आणि गुंतवणुकीवर भर दिला आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं आहे. त्यासाठी मागणी आणि पुरवठा वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे देशात खाजगी गुंतवणुकीला चालना मिळाली, असंही त्या म्हणाल्या.
आम्ही इनकम टॅक्समध्ये सवलत दिली. सामान्यांचा वाचलेला पैसा गुंतवणुकीत जाणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. करप्रणाली साधीसोपी करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्याबद्दल उत्सुक आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
Dear PM,
Please try your magical exercise routine a few more times. You never know, it might just start the economy. #Modinomicspic.twitter.com/T9zK58ddC0
या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी भरीव निधी देण्यात आलाय. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारांवर भर दिला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. पायाभूत संरचनेवर भर देण्यासाठी या सुविधांमध्ये 100 लाख कोटी गुंतवणार असल्याचंही त्या म्हणाल्या. वित्तीय तुटीमुळे भारताचं रेटिंग कमी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.