News18 Lokmat

प्रियांका गांधी लढणार नाहीत लोकसभेची निवडणूक?

गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काँग्रेसने उत्तर प्रदेशातून 11 नावांची घोषणा करुन सपा आणि बसपावरचा दबाव वाढवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 10:19 PM IST

प्रियांका गांधी  लढणार नाहीत लोकसभेची निवडणूक?

नवी दिल्ली 7 मार्च  : प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातल्या प्रवेशाने उत्तर प्रदेशात राजकीय समिकरण बदललं गेलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला. मात्र त्या निवडणूक लढणार नाहीत असे संकेत मिळत आहेत. प्रियांका यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. हा अतिशय महत्त्वाचा भाग असल्याने प्रियांकाना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलं तर प्रचारात एकाच मतदार संघात जास्त वेळ अडकून पडावं लागत. त्यामुळे त्या निवडणूक लढविण्याची शक्यता नाही असं बोललं जातंय.

प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशाची घोषणा झाली तेव्हा त्या रायबरेली किंवा फुलपूर मधून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्या यादीत प्रियांकांचं नाव नाही तर तर सोनिया गांधींना रायबरेली या त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

फुलपूर हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे प्रियांकांना तेथूनही उमेदवारी मिळू शकते अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं कध म्हटलेलं नव्हतं.

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाच्या आघाडीत आता काँग्रेसही सहभागी होणार असल्याची शक्यता असून काँग्रेसला 15 जागा सोडण्याची तयारी या पक्षांनी दाखवलीय. समाजवादी पक्ष 7 तर बसपा 6 जागा सोडायला तयार आहे. या आधी 10 जागा देण्याचा प्रस्ताव प्रियांका गांधी यांनी फेटाळला होता.

या संदर्भात काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून निवडणुकांची तारखा जाहीर होण्याच्या आधी या महाघाडीची घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. मात्र गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काँग्रेसने उत्तर प्रदेशातून 11 नावांची घोषणा करुन सपा आणि बसपावरचा दबाव वाढवला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2019 10:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...