प्रियांका गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक.. बंगल्यात घुसली 'स्कॉर्पिओ', त्याने मागितला सेल्फी!

प्रियांका गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक.. बंगल्यात घुसली 'स्कॉर्पिओ', त्याने मागितला सेल्फी!

जाहीर सभेत प्रियांका गांधी यांच्याऐवजी 'प्रियांका चोप्रा जिंदाबाद'च्या घोषणा

  • Share this:

प्रशांत लीला रामदास,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली,2 डिसेंबर: कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तिंनी त्यांच्या बंगल्यात स्कॉर्पिओ कारच्या माध्यमातून प्रवेश केला. एवढेच नाही तर त्या अनोळखी नागरिकांनी प्रियांका यांच्यासोबत 'सेल्फी' फोटो काढण्याची मागणी केली. प्रियांका यांनी या नागरिकांना कोणतीही वेळ दिली नव्हती. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, ही घटना आठवडाभरापूर्वीची आहे. यासंदर्भात सीआरपीएफकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रियांका गांधी यांच्याऐवजी 'प्रियांका चोप्रा जिंदाबाद'च्या घोषणा...

दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांच्या नेतृत्त्वात झालेल्या एका जाहीर सभेत प्रियांका गांधी यांच्याऐवजी 'प्रियांका चोप्रा जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुभाष चोप्रा हे देखील दिसत आहेत.

काँग्रेस नेत्या प्रथम सोनिया गांधी जिंदाबादच्या घोषणा केल्या. त्यानंतर अचानक त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी प्रियांका गांधी यांचे नाव न घेता प्रियांका चोप्रा जिंदाबाद.. च्या घोषणा दिल्या. ही चूक लक्षात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी याबाबत माफी देखील मागितली आहे.

घोषणा ऐकताच हैराण झाले सुभाष चोप्रा..

प्रियांका चोप्रा जिंदाबाद.. च्या घोषणा ऐकताच सुभाष चोप्रा हैराण झाले आणि स्टेजवर उभे राहिले. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांत राहण्याची सूचना दिल्या.

दरम्यान, घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिजन्सकडून काँग्रेसचा खिल्ली उडवली जात आहे.

काँग्रेसचे 'पोलखोल' अभियान

दुसरीकडे, दिल्लीत विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसने देखील आपल्या अस्तित्वासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने 'पोल खोल' अभियान सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 06:26 PM IST

ताज्या बातम्या