PMC बँक घोटाळा: खातेदाराचा जीव गेला, घोटाळेबाज मजेत, सरकार ढिम्म -प्रियंका गांधी

PMC बँक घोटाळा: खातेदाराचा जीव गेला, घोटाळेबाज मजेत, सरकार ढिम्म -प्रियंका गांधी

'PMC बँक घोटाळ्यातले आरोपी मजा करत आहेत. सरकार त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करत नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 15 ऑक्टोंबर : PMC बँक घोटाळा प्रकरण सध्या देशभर गाजतेय. निवडणुकीचे दिवस असल्याने त्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी या घोटाळा प्रकरणावरून मोदी सरकारला लक्ष्य केलंय. PMC बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता त्यावरून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. ट्विट करून प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. त्या म्हणतात, या घोटाळा प्रकरणी खातेदार असलेल्या संजय गुलाटींचा जीव गेलाय. मात्र या घोटाळ्यातले आरोपी मजा करत आहेत. सरकार त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करत नाही अशी टीका त्यांनी केलीय. या प्रकरणी बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध सरकारने कारवाई सुरू केलीय. अनेक संचालकांची संपत्ती जप्तही केलीय. या प्रकरणी खातेदारांनी काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना घेराव घातला होता. आरबीआयशी बोलून यातून आणखी काही मार्ग काढतो येते का हे बघणार असल्याचं आश्वासनही त्यांनी खातेदारांना दिलं होतं.

पंकजा मुंडेंना बीडमध्ये धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही खातेदारांचं शिष्टमंडळ भेटलं होतं. त्यांनीही मदतीचं आश्वासन दिलं होतं. पण अडकलेले पैसे परत मिळत नसल्यानं खातेदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक खातेदार धास्तावलेले असून पैसे मिळतील की नाही या विंवचनेत त्यांची दिवळी जाणार आहे. आता या प्रकरणी राजकारणही होत असल्याने या प्रकरणाची चर्चा होतेय.

लातूरमध्ये 'स्टार वॉर'; रितेश देशमुख Vs बाबा रामदेव असा रंगणार सामना

संचालकांचे असेही कारनामे

PMC बँकेचे खातेदार एकीकडे त्यांच्या पैशांसाठी लढा देतायत तर दुसरीकडे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचा निलंबित एमडी जॉय थॉमस याच्या संपत्तीबद्दल अनेक गोष्टी समोर येतायत. जॉय थॉमसच्या प्राथमिक चौकशीत त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही नव्या गोष्टी उघड झाल्या आहेत. 2005 मध्ये जॉय थॉमसने त्याच्या PA शी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. या दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यात 9 फ्लॅट्सची नोंदणी करण्यात आली. आपल्या दोन पत्नी आहेत आणि दोन कुटुंबं आहेत हे जॉय थॉमस याने चौकशीत मान्य केलंय.त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना त्याचे PA शी नातेसंबंध जुळले. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो जुनैद खान झाला.

मित्रांच्या डोळ्यादेखत सहस्त्रकुंड धबधब्यात वाहून गेले 4 जण

कुठे गेली ती महिला?

या लग्नाच्या वेळी या महिलेने तिचा जॉब सोडला आणि मी दुबईला जातेय, असं ऑफिसमध्ये सांगितलं, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडिया ने दिली आहे. बँकेतल्या कर्मचाऱ्यांना तिच्याबद्दलची ही शेवटची माहिती होती.त्यानंतर ती पुण्याला गेली आणि जॉय थॉमस म्हणजेच जुनैद खानने मुंबई आणि पुण्यात प्रवास सुरू केला. पुण्यामध्ये त्या महिलेने एवढी मालमत्ता कशी विकत घेतली याचा तपास आम्ही करत आहोत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. PMC बँकेत घोटाळा झाला त्याच काळात या मालमत्ता विकत घेण्यात आल्या का याचा तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या