News18 Lokmat

अमित शहांच्या आजाराची काँग्रेसने केली थट्टा, भाजपचा हल्ला बोल!

काँग्रेसला अमित शहांबद्दल आणि अमित शहांना काँग्रेसच्या नेत्यांबद्दल कायम अढी असलेली दिसून येते.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 07:30 PM IST

अमित शहांच्या आजाराची काँग्रेसने केली थट्टा, भाजपचा हल्ला बोल!

नवी दिल्ली 17 जानेवारी : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने कुठल्याही विषयाचं राजकारण करायला राजकीय पक्षांना फक्त निमित्तच हवं असतं. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यांच्यावर सध्या 'एम्स'मध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती खुद्द अमित शहांनीच ट्विटवरून दिली होती. त्यावर काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी दिलेली प्रतिक्रिया आता वादाचं कारण ठरली.


हरिप्रसाद म्हणाले, कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याची अमित शहांना घाई झाली होती. पण काँग्रेसचे आमदार परत आल्याने त्यांना धक्का बसला असावा. त्यामुळेच त्यांना ताप आला आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. या प्रतिक्रियेवर राजकारण झालं नसतं तरच नवल.




केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी शहांच्या प्रकृतीवरून ज्या असभ्य आणि खालच्या स्तरावरच्या भाषेचा प्रयोग केला तो काँग्रेसच्या विचारांचा स्तर दर्शवतो असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.


भाजपने आज एक ट्विट करत शहांच्या प्रकृतीविषयी माहितीही दिली आहे. शहा यांची प्रकृती चांगली असून योग्य उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळेल अशी माहितीही त्यात देण्यात आलीय.

काँग्रेस आणि अमित शहांमध्ये कायम कडवटच नातं राहिलं आहे.




युपीए सरकार असताना सोहराबुद्दीन प्रकरण आणि इतर काही प्रकरणात केंद्र सरकारने शहांमागे चौकशीचा ससेमीरा लावला होता. त्यांना अनेक महिने गुजरातबाहेरही राहावं लागलं होतं असं अमित शहांच वाटतं असतं. त्यामुळे त्यांच्याही मनात काँग्रेसच्या नेत्यांबद्दल राग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...