VIDEO: 'दशरथ यांच्या महालात 10 हजार खोल्या होत्या, भगवान राम नक्की कुठे जन्मले?'

VIDEO: 'दशरथ यांच्या महालात 10 हजार खोल्या होत्या, भगवान राम नक्की कुठे जन्मले?'

'राम मंदिर 'त्या' वादग्रस्त जागेवरच बांधण्याचा हट्ट का आहे, हे समजण्यापलीकडचं आहे. मंदिर तुम्ही दुसऱ्या जागीही बांधू शकता'

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जानेवारी : 'दशरथ यांच्या महालाला 10 हजार खोल्या होत्या, भगवान राम नक्की कोणत्या खोलीत जन्मले?' असं वक्तव्य काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना अय्यर यांनी हिंदुत्ववादी संघटनांनी रामजन्माबाबत केलेल्या दाव्यांवर सवाल उपस्थित केला आहे.

'राम मंदिर 'त्या' वादग्रस्त जागेवरच बांधण्याचा हट्ट का आहे, हे समजण्यापलीकडचं आहे. मंदिर तुम्ही दुसऱ्या जागीही बांधू शकता,' असं म्हणत मणिशंकर अय्यर यांनी राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'दशरथ यांच्या महालामध्ये खूप खोल्या होत्या. तिथं जवळपास 10 हजार खोल्या होत्या, असं म्हटलं जातं. तुम्ही कसं शोधणार की भगवान राम यांचा जन्म नक्की कुठे झाला होता,' असं मणिशंकर अय्यर म्हणाले.दरम्यान, मणिशंकर अय्यर यांनी असं वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या अशा विधानांमुळे ते याआधीही अनेकदा वादात सापडले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका विधानावर खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

राम मंदिर : अंतिम तारखेची पहिली सुनावणी 10 जानेवारीला

राम मंदिराचे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात आहे. अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादग्रस्त भूखंडप्रकरणी नियमित सुनावणी करावी की नाही, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याबाबतची आजची सुनावणी केवळ 60 सेंकदात संपली. 10 जानेवारीला नियमित सुनावणी करण्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं या सुनावणीत स्पष्ट करण्यात आलं.

याप्रकरणी दाखल 14 याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 2010 मध्ये अलाहाबाद कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. तर यावेळी त्रिसदस्यीय खंडपीठाची स्थापना 10 जानेवारीला होईल.


CBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, सीबीआयचे आलोक वर्मा संचालकपदी कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या