कुणाचे हात मतबूत, आपले की त्या खून करणाऱ्याचे; मणिशंकर अय्यर यांची मोदींवर नाव न घेता टीका

गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ''नीच माणूस, गंदी नाली का किडा,'' अशी टीका केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 14 जानेवारी : CAAआणि NRC विरोधातलं वातावरण शांत होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. याविरोधात आंदोलनं सुरूच आहेत. राजधानी दिल्लीतल्या शाहीनबाग परिसरात आज विरोध करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा नाव न घेता जहरी टीका केलीय. या आधीही अय्यर यांनी मोदींवर अनेकदा जहरी टीका केली होती. त्यामुळे देशभर वादही निर्माण झाला होता. त्या वक्तव्यांमुळे काँग्रेसला निवडणुकीत फटका सहन करावा लागला. काहीवेळा काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यांपासून पक्षाला दूरही केलं होतं. मात्र अय्यर यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.

अय्यर आपल्या भाषणात म्हणाले, सगळ्यांनी आता बलिदानासाठी तयार राहिलं पाहिजे. हे मी फक्त तुम्हाला सांगत नाहीये तर त्यात मीही बलिदान देण्यासाठी तयार आहे. बघुया कुणाचे हात मजबूत आहेत ते... आपले की त्या खून करणाऱ्याचे. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

काय बोलले होते मणिशंकर अय्यर

डिसेंबर 2017मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ''नीच माणूस, गंदी नाली का किडा,'' अशी टीका केली होती. त्याचा भाजपनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुरेपूर उपयोग केला होता. मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे राहुल गांधी यांनी त्यांना तात्काळ पंतप्रधानांची जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. पण मणिशंकर यांनी माफी मागतानाही जर तर शब्दांचा प्रयोग केल्याने संतापलेल्या राहुल गांधी यांनी मणिशंकर यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली होती.

मोदींना म्हटलं होतं चायवाला

मणिशंकर अय्यर यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना 'चहावाला' म्हणून हिनवल्याने काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तरीही मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणुकीत पुन्हा तीच चूक करत पंतप्रधानांना खालच्या भाषेत लक्ष केलं होतं. त्याचा देखील भाजपला फायदा झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 10:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading