नवी दिल्ली 19 डिसेंबर: काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी अब्रुनुकसानीच्या दावा प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या मुलाची माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनी जयराम रमेश आणि The Caravan या मासिकाविरोधात खटला दाखल केला होता. त्या प्रकरणात रमेश यांनी माफी मागितली. निवडणुकीच्या काळात रागाच्या भरामध्ये आपण आरोप केले होतो. मी त्या आरोपांची सत्यता पडताळून पाहायला हवी होती असंही त्यांनी म्हटलं आहे.
रमेश यांनी कोर्टापुढे आपलं म्हणणं मांडलं आणि तडजोडीची भूमिका घेतली. पुरावे नसताना आरोप केल्यामुळे आपण माफी मागण्यास तयार आहोत असं सांगितलं. तर रमेश यांची माफी मागणे हे पुरेसे असून आपणास मान्य असल्याचं विवेक डोवाल यांनी म्हटलं आहे. मात्र The Caravan विरुद्ध हा खटला सुरूच राहणार आहे. The Caravan मधल्या लेखात डोवल आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध आरोप लावण्यात आले होते. विवेक हे विदेशात एक फर्म चालवत असून त्याचे प्रमोटर्स हे वादग्रस्त आहेत असं सांगत गैरव्यवहार झाल्याचं त्या लेखांमध्ये म्हटलेलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016मध्ये नोटबंदीची घोषणा केल्यानंतर 13 दिवसांमध्ये या फर्मचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं असंही त्या लेखात म्हटलं होतं. विवेक डोवल यांनी ते सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर त्यांनी हा अब्रुनुकसानिचा खटला दाखल केला होता. या प्रकरणावरून देशभर वादळही निर्माण झालं होतं.Congress leader Jairam Ramesh said, I gave the statement against Vivek Doval and made several allegations in heat of the moment as it was the time of elections. I must verify it.
— ANI (@ANI) December 19, 2020
The case against Caravan magazine to continue https://t.co/XWOTsmq1tX