LIVE NOW

LIVE : भाजप देशभर काढणार अटलजींच्या अस्थिच्या कलश यात्रा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं.

Lokmat.news18.com | August 23, 2018, 11:32 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 23, 2018
auto-refresh

Highlights

नवी दिल्ली,22 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाला सात दिवस झाले आहेत. भाजप पूर्ण देशभर अटलजींच्या अस्थिंची कलशयात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपच्या मुख्यालयात सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना अस्थी कलश सोपवले. त्याचबरोबर देशभर श्रद्धांजली सभांचंही आयोजन करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. वाजपेयींचं 16 ऑगस्टला निधन झालं होतं. 19 ऑगस्टला हरिव्दारमध्ये वाजपेयींच्या अस्थिंच विसर्जन करण्यात आलं होतं. देशातल्या प्रमुख नद्यांमध्येही अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार आहे.
11:08 am (IST)

कुर्ग : दक्षिण कर्नाटकमधलं थंड हवेचं ठिकाण कूर्गमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मडिकेरी जिल्ह्यातले अनेक महत्वाचे रस्ते घाट स्वरुपाचे आहेत.. यातले अनेक रस्ते अक्षरशः वाहून गेलेत किंवा खचले आहेत. सोमवारपेट, विराजपेटला जायचे रस्ते बंद आहेत.. चिखल हटवण्याच्या कामालाच एवढा वेळ लागतोय की हे रस्ते पुन्हा बांधून तयार व्हायला खूपच वेळ लागणार आहे, हे निश्चित.कूर्ग अर्थात मडिकेरी भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी केंद्र सरकारनंही मदत पाठवली आहे. मैसूर हवाई तळावर वायुदलाची 2 मोठी विमानं काल लँड झाली. खायच्या वस्तू, धान्य, साबण, सॅनिटरी नॅपकिन अशा अनेक महत्वाच्या वस्तू आता मैसूरहून मडिकेरीला पाठवण्यात येत आहेत. 

 

11:07 am (IST)

कोच्ची : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झालेत. ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपतं घेण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जे लोक घर सोडून गेले होते, ते आता परतायला लागलेत.. पण घरातलं चित्र फारसं आशादायक नाही. कारण पै पै जमवून घेतलेल्या महागड्या वस्तू संपूर्णपणे खराब झाल्या आहेत.. टीव्ही, फर्निचर, एसी, कॉम्प्युटर, पदडे... पावसाच्या पाण्यानं सगळंच बाद केलंय.. हजारो कुटुंब अशी आहेत ज्यांचं नुकसान लाखोंमध्ये गेलं आहे.. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय.. आता या सर्वांवर विमा कंपन्यांकडून पैसे मंजूर करून घ्यायची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे. 

 

9:57 am (IST)

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. अस्वस्थ वाटू लगाल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरीमधल्या प्रायमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुंबई काँग्रेसचे दिर्घकाळ अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांचे ते वडील होते. 1972 मध्ये त्यांनी विद्यार्थी नेते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. गांधी घराण्याचे ते विश्वासू म्हणून ओळखले जात. राजीव गांधींचे जवळचे मित्र होते. खासदार, केंद्रात मंत्री आणि पक्षातही विविध पदांवर त्यांनी काम केलं. मुंबईत काँग्रेस वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1987 मध्ये त्यांनी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं होतं.

 

Load More