कर्नाटकातल्या 'राजीनामा नाट्या'वर दिग्विजय सिंहांचा गौप्यस्फोट

भाजपचं जागासंबंधीचं भाकित दरवेळी खरंच कसं ठरतं असा सवाल करत त्यांनी EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 03:20 PM IST

कर्नाटकातल्या 'राजीनामा नाट्या'वर दिग्विजय सिंहांचा गौप्यस्फोट

चंद्रकांत फुंदे पुणे 12 जुलै : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी कर्नाटकातल्या घडामोडींवर मोठा गौप्यस्फोट केलाय. नोटबंदीच्या काळात भाजपने जो पैसा कमावला होता त्याचा वापर आता करण्यात येतोय असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय. पैसा आणि बळाचा वापर करून भाजप आमदारांची खरेदी करत असल्याचं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. दिग्विजय सिंह हे दरवर्षी आषाढीला पंढरपूरला येत असतात. त्यावेळी पुण्यात थांबले असता त्यांनी हे गंभीर आरोप केलेत.

VIDEO: पिसाळलेल्या बैलाचा विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव भोपाळ मतदारसंघातून केला होता. भाजपचं जागासंबंधीचं भाकित दरवेळी खरंच कसं ठरतं असा सवाल करत त्यांनी EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते पुढं म्हणाले, मोदी फक्त स्वप्न दाखवतात, रोजगार निर्मिती थांबली आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी हे सुद्धा आणखी एक स्वप्नच म्हणावं लागेल. अंतरीम आणि अंतिम बजेटमध्ये 1लाख 70 हजार कोटींचा फरक कसा याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं असंही ते म्हणाले.

मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

पुलवामा हल्ल्याची गुप्तचर विभागाला पूर्वसूचना होती, मात्र तातडीने कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दोषींवर कारवाई का नाही असा प्रश्न मी प्रश्न विचारला म्हणून मला देशद्रोही ठरवलं गलं.

Loading...

मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना माझ्याविरोधात उभं केलं गेलं पण साध्वींवर अजूनही कारवाई का नाही असा सवाल त्यांनी केला. मोदी फक्त बोलतात, माफ करू शकणार नाही पण पुढे काहीच नाही असंही अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...