नेत्यांच्याच मुलांना जागा मिळते, राहुल गांधींच्या अध्यक्षनिवडीवर काँग्रेस नेत्यांकडून घरचा अहेर

नेत्यांच्याच मुलांना जागा मिळते, राहुल गांधींच्या अध्यक्षनिवडीवर काँग्रेस नेत्यांकडून घरचा अहेर

"या पक्षात महात्मा गांधींनी आपल्या मुलांना निवडणूक लढवू दिली नाही. पण आज जास्तीत जास्त नेत्यांच्याच मुलांना जागा मिळते."

  • Share this:

30 नोव्हेंबर : काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या राज्यभिषेकाची तयारी सुरू आहे. अशातच मुंबई काँग्रेसचे नेते शेहजाद पूनावाला यांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय. राहुल गांधी यांचं अध्यक्ष होणे 'हे सलेक्शन आहे, इलेक्शन नाही' अशी टीका करणारं शेहजाद यांचं पत्र लिक झालंय.

काँग्रेस पक्षामध्ये घराणेशाही आहे, इथं काही कुटुंबातल्या लोकांनाच तिकिटं मिळतात, पक्षांतर्गत निवडणुकींमध्येही नेत्यांच्या मुलांनाच तिकिटं मिळतात, असं पत्र पूनावाला यांनी पक्ष नेतृत्वाला लिहिलं होतं. मात्र हे पत्र लिक झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडालीये. त्यामुळे त्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. हे पत्र लिक कसं झालं, हे मला माहीत नाही, असं पूनावाला म्हणालेत. पण यामुळे साहजिकपणे, पक्षातले मोठे नेते त्यांच्यावर नाराज झालेत. पुनावालांवर आम्ही कारवाई करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

 पूनावाला यांच्या पत्राचं संक्षिप्त स्वरुप..

"2011 सालापासून मी पक्षातल्या काही त्रुटी सांगण्यासाठी वेळ मागतोय. घराणेशाहीमुळे केवळ काही कुटुंबांनाच महत्व दिलं जातं. पक्ष शिष्टाचाराप्रमाणं मी माझ्या नेत्याला मेल केला होता. मेल लीक कसा झाला ते मला माहीत नाही. मी फक्त एवढंच लिहिलंय की पक्षातल्या निवडणुकीची प्रक्रिया निर्दोष नव्हती. कोण जिंकणार याची निवड आधीच झाली होती. या पक्षात महात्मा गांधींनी आपल्या मुलांना निवडणूक लढवू दिली नाही. पण आज जास्तीत जास्त नेत्यांच्याच मुलांना जागा मिळते. मी हाही प्रस्ताव ठेवला होता की एका कुटुंबात एकालाच तिकीट मिळावं. म्हणजे जर मला तिकीट दिलं, तर माझ्या भावाला ते दिलं जाऊ नये. पण हे मान्य होत नाही."

First published: November 30, 2017, 2:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading