101 दिवस रुग्णालयात, 51 दिवस व्हेंटिलेटरवर; तरी कोरोनाला हरवून घरी परतला 'हा' कॉंग्रेस नेता

101 दिवस रुग्णालयात, 51 दिवस व्हेंटिलेटरवर; तरी कोरोनाला हरवून घरी परतला 'हा' कॉंग्रेस नेता

भरतसिंग सोलंकी यांना कोरोनामुळे 51 दिवसाचे व्हेंटिलेटर आणि 101 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणारे आशियाईतील पहिले रुग्ण ठरले आहेत.

  • Share this:

वडोदरा, 01 ऑक्टोबर : भारतासह संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 63 लाखांच्या घरात गेली आहे. अशा परिस्थितीत गुजरातमधील कॉंग्रेसचे नेत्यानं एक विक्रम केला आहे. या नेत्यानं कोरोना झाल्यानंतर 101 दिवस रुग्णालयात 51 दिवस व्हेंटिलेटवर राहून कोरोनावर मात करून दाखवले आहे. या कॉंग्रेस नेत्याचे नाव आहे भरतसिंग सोलंकी.

गुजरातचे माजी अध्यक्ष आणि संपुआ सरकारमधील मंत्री असलेले कॉंग्रेस नेते भरतसिंग सोलंकी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भरतसिंग सोलंकी यांना कोरोनामुळे 51 दिवसाचे व्हेंटिलेटर आणि 101 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणारे आशियाईतील पहिले रुग्ण ठरले आहेत. मुख्य म्हणजे सोलंकीने यांनी ही लढाई जिंकत कोरोनाला हरवलं आहे.

वाचा-सावधान! महाराष्ट्रात येतोय कोरोनापेक्षा भयंकर काँगो फीव्हर, जाणून या तापाविषयी

22 जून रोजी भरतसिंग सोलंकी यांना ताप आणि घशात दुखण्याच्या तक्रारीनंतर वडोदरा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना अहमदाबादच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोलंकी तब्बल 51 दिवस व्हेंटिलेटरवर होते.

वाचा-कोरोनामुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू जास्त का? समोर आलं धक्कादायक कारण

वाचा-राज्यातले उपचाराधीन रुग्ण झाले कमी; पण 24 तासांत 481 जणांचा झाला Covid मृत्यू

सोलंकी यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्यांना कोरोनामुळे मूत्रपिंडाचा आणि यकृताचा आजार झाला. यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 101 दिवस लागले आणि आता बरे झाल्यानंतर त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतसिंग सोलंकी गुजरात कॉंग्रेसचे प्रभारी राजीव सातव आणि विरोधी पक्षनेते परेश धनानी रुग्णालयाची भेट घेण्यासाठी गेले होते. गेल्या राज्यसभा निवडणुकीत सोलंकी कॉंग्रेसचे अक्ष्यक्ष होते.

Published by: Priyanka Gawde
First published: October 1, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या