काँग्रेसच्या या नेत्याने ठोकला पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा, राहुल गांधींना पाठवलं पत्र

काँग्रेसच्या या नेत्याने ठोकला पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा, राहुल गांधींना पाठवलं पत्र

काँग्रेसमधून कुणीतरी पुढे येऊन हे पद सांभाळण्याची हिंम्मत दाखवली पाहिजे. त्यासाठीच मी पुढाकार घेतला आहे.

  • Share this:

भोपाळ 7 जून : लोकसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. पदासाठी योग्य पर्याय शोधा असं त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. आता मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी अध्यक्षपदावर दावा केलाय. राहुल गांधी यांची इच्छा नसेल आणि कुणी पुढे येत नसेल तर मी हे पद सांभाळायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तशा प्रकारचं पत्रही त्यांनी राहुल गांधी यांना पाठवलं आहे.

आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे शेरखान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. महिन्याभरात पर्याय शोधा असं त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं. सर्वच नेत्यांनी त्यांना पदावर राहण्याचा आग्रह धरला. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. गांधी कुटुंबाशीवाय कुणी हे पद सांभाळण्यासाठी पुढं आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं.

राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा आधार घेत अस्लम शेरखान यांनी हा दावा केलाय. ते काही वर्ष केंद्रीय मंत्रीही होते. ते म्हणाले, राहुल गांधी यांनीच पदावर राहावं अशी इच्छा आहे. मात्र त्यांची इच्छाच नसेल तर त्यांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. अन्य कुणी नेते हे पद सांभाळण्यासाठी पुढे येत नसती तर मी हे पद सांभाळण्यासाठी तयार आहे. तसं पत्रही पाठवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दोन वर्षांसाठी हे पद मला देऊन पाहा असंही ते म्हणाले.

काँग्रेसमधून कुणीतरी पुढे येऊन हे पद सांभाळण्याची हिंम्मत दाखवली पाहिजे. त्यासाठीच मी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसला आज राष्ट्रवादीशी जोडण्याची गरज आहे असंही अस्लम शेरखान यांनी सांगितंलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading