मराठी बातम्या /बातम्या /देश /

काँग्रेसचे आणखी एक नेते आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं क्वारंटाइन

काँग्रेसचे आणखी एक नेते आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं क्वारंटाइन

सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोना विषाणूची सर्वसाधारण लक्षणं आहेत. पण एका नव्या अभ्यासानुसार, कोव्हिडच्या बर्‍याच रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणं असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न मेडिसीनचा यासंबंधी अभ्यास केला आहे. रूग्णांच्या न्यूरोलॉजिकल लक्षणांवरील हा आढावा अ‍ॅनाल्स ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोना विषाणूची सर्वसाधारण लक्षणं आहेत. पण एका नव्या अभ्यासानुसार, कोव्हिडच्या बर्‍याच रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणं असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न मेडिसीनचा यासंबंधी अभ्यास केला आहे. रूग्णांच्या न्यूरोलॉजिकल लक्षणांवरील हा आढावा अ‍ॅनाल्स ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

दिल्लीत आज 3,460 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 77,240वर गेली आहे. तर मृत्यूसंख्या 2,492 वर गेली आहे.

नवी दिल्ली 26 जून: दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काँग्रेसचे नेते (Congress Leader) आणि प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek manu singhvi) आणि त्यांच्या पत्नीची टेट पॉझिटिव्ह (covid-19) आली आहे. सिंघवी यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आली आली आहे. नंतर त्यांच्या पत्नीचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सिंघवी यांच्या घरातल्या इतर सदस्यांचीही आता टेस्ट करण्यात येणार आहे.

या आधी काँग्रेसचे नेते संजय झा हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांनीच ही माहिती ट्विटरवर दिली होती.

दिल्लीत आज 3,460 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 77,240वर गेली आहे. तर मृत्यूसंख्या 2,492 वर गेली आहे.

 

दरम्यान,  दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन (Health Minister Satyendra Jain) यांनी कोरोनाविरोधातील लढा जिंकला आहे. प्लाझ्मा थेरेपीने (plasma therapy) त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ज्यानंतर काही दिवसांतच त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही दिला जाणार आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना काही दिवसांपूर्वी ताप येत होता आणि श्वास घ्यायला त्रास होता होता. त्यांना राजीव गांधी सुपर स्‍पेशलियटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झालं असल्याचं समजलं.

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन, 1410 गावात ग्राउंड झिरो स्कॅनिंग

यानंतर त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. सुरुवातीला चाचणी निगेटिव्ह आली पण रुग्णालयात केलेली दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) त्यांना हलवलं.

महाराष्ट्रातही उद्रेक

अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत होत असलेली वाढ अजुनही सुरूच आहे. आज तर आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5024 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 152765वर गेला आहे. तर आज 175 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7106 वर गेला आहे. मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 72175 वर गेलीय तर मृत्यूसंख्या 4179 वर गेली आहें.

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा विस्फोट? राज्यात युद्धपातळीवर सज्जतेच्या सूचना

ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा (Covid-19) विस्फोट होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात COVID-19 चे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh tope)यांनी दिली. Coronavirus ची साथ अनलॉकनंतर सातत्याने वाढत आहे. पुढच्या आठवड्यात आता Unlock 2 अर्थात दुसऱ्या टप्प्यातल्या सूचना येणार आहेत.

संकलन - अजय कौटिकवार

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus update