भाजपचं ऑपरेशन 'लोटस'; कर्नाटकात Congress – JD(S) सरकार धोक्यात?

कर्नाटकमध्ये Congress – JD(S) सरकारचं भवितव्य आता अधांतरी आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 01:41 PM IST

भाजपचं ऑपरेशन 'लोटस'; कर्नाटकात Congress – JD(S) सरकार धोक्यात?

बंगळूरू; 02 जुलै : कर्नाटकमध्ये आता मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना सुरूवात झाली आहे. कारण, काँग्रेसच्या दोन आमदारांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. रमेश जारकीहोळी आणि आनंद सिंग अशी या दोन आमदारांची नावं आहेत. शिवाय, येत्या 3 दिवसात आणखी 12 आमदार राजीनामे देणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील अनेक आमदार मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आमदारांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी एच. डी. देवेगौडा यांनी देखील सरकार किती टिकेल  याबद्दल शंका वाटते अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून देखील अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं हातमिळवणी केली होती. शिवाय, जास्त संख्याबळ असताना देखील काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली होती. पण, आता मात्र काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकातील सरकार जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘बॅटमॅन’ आकाश विजयवर्गीयची पक्षातून हकालपट्टी?

अडीच दिवसांचं सरकार

दरम्यान, भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर अवघ्या अडीच दिवसांमध्ये येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनं केलेल्या सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील गेलं होतं. कर्नाटकमध्ये हातचं गेलेलं सरकार भाजपच्या देखील जिव्हारी लागलं होतं. तेव्हापासून भाजपनं सरकार अस्थिर करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण, आता मात्र काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकारचं राजकीय भवितव्य अधांतरी आहे. एच.डी. कुमारस्वामी यांनी 23 मे 2018ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

'माणसं किड्याप्रमाणे मरत असतील तर हे सरकारकचे अपयश', पाहा अजित पवार UNCUT VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...