कर्नाटकमध्ये होणार मध्यावधी निवडणुका? काय म्हणाले माजी पंतप्रधान देवेगौडा

कर्नाटकमध्ये होणार मध्यावधी निवडणुका? काय म्हणाले माजी पंतप्रधान देवेगौडा

Congress - JD( S) Government In Karnataka : कर्नाटकमधील सरकार टिकणार की जाणार? हे आता पाहावं लागणार आहे.

  • Share this:

बंगळूरू, 21 जून : माजी पंतप्रधान एस. डी. देवेगौडा यांनी दिलेल्या संकेतावरून कर्नाटकमध्ये मध्यावधी निवडणुका होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस जेडीएससोबत असली तरी त्यांची वागणूक चांगली नसल्याचं एस. डी. देवेगौडा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसची सरकारप्रति असलेली वागणूक योग्य नाही. जनता सर्वकाही पाहत आहे. पण, सरकार किती काळ टिकेल याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही असं एस. डी. देवेगौडा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कर्नाटक – जेडीएस सरकार टिकणार की जाणार? यावर चर्चा होताना दिसत आहेत. विधानसभा निकालानंतर भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस - जेडीएसनं आघाडी केली होती. तर, कुमारस्वामी यांची मुख्यमंत्री म्हणून निवडणूक करण्यात आली होती.

आणखी काय म्हणाले देवेगौडा

विधानसभा निकालानंतर काँग्रेसचे नेते आले आणि त्यांनी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावेळी काँग्रेस नेत्यांमध्ये सहमती होती की याबद्दल मला कल्पना नाही. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसनं आपली ताकद गमावली आहे. काँग्रेसचे नेते सध्या राज्य सरकारमध्ये ढवळाढवळ करत असल्याचं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

तिहेरी तलाक विधेयकावरून लोकसभेत गदारोळ; असदुद्दीन ओवैसींचा विरोध

जेडीएसला सरकारमधून बाहेर पडायचंय?

जेडीएसकडून सरकारला कोणताही धोका नाही. आम्हाला सरकारमध्ये राहायचं आहे. पण, सरकार किती काळ टिकेल याबद्दल काहीही सांगता येत नसल्याचं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. सरकार चालवणं हे कुमारस्वामी यांच्या हातामध्ये नाही. काँग्रेसच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. काँग्रेस सरकारला समर्थन देत असली तरी त्यांची वागणूक ठिक नसल्याचं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

‘मल्लिकार्जून खर्गेचं नाव होतं चर्चेत’

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव देखील चर्चेत होतं असा खुलासा माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केला आहे.

मेट्रो स्थानकाजवळ फर्निचरच्या दुकानाला आग, यासोबत इतर 18 महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading