न्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग!-अरूण जेटलींचं खुलं पत्र

न्यायाधीशांना घाबरवण्यासाठी काँग्रेसचा महाभियोग!-अरूण जेटलींचं खुलं पत्र

तसंच महाभियोगाचा वापर काँग्रेस राजकीय हत्यारं म्हणून करते आहे असा आरोपही अरूण जेटलींनी केला आहे.

  • Share this:

20 एप्रिल:  काँग्रेस जो महाभियोग  आणते आहे तो महाभियोग नसून सुडाची याचिका आहे असा सणसणाती आरोप  वित्तमंत्री अरूण जेटलींनी  केला आहे.  अरूण जेटलींनी एक खुलं पत्रचं फेसबुकवर लिहिलं आहे. या पत्रात या साऱ्याच प्रकरणाचा आढावा त्यांनी घेतला आहे.

 

जज लोयांप्रकरणी सुप्रीम कोर्टाने 114  पानी निकाल दिला आहे. या निकालाबद्दल  ते म्हणाले की निकालपत्रात कथित   हत्याकांड कसं खोटं आहे याच्या  प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला आहे.  तसंच अमित शहांचा सोहराबुद्दीन प्रकरणाशी काहीच संबंध नाही हेही त्यांनी स्पष्टपणे मांडून सोहराबुद्दीन हत्याकांडाचा संबंध केंद्राच्या काही  सुरक्षा यंत्रणाशी असल्याची  माहिती त्यांनी दिली आहे.

 

तर अशाप्रकारे महाभियोग आणून देशातील न्यायव्यवस्थेला ,आणि न्यायधीशांना इशारा देण्याचाच प्रयत्न काँग्रेस करते आहे. आमच्या विरोधात गेला तर याद  राखा फक्त 50 खासदारांसह आम्ही तुमची कारकीर्द संपवू शकतो असा इशाराच  काँग्रेस देतंय असा आरोपही अरूण जेटलींनी केला आहे. त्यात महाभियोग फक्त अकार्यक्षमता आणि  गैरवर्तणूक सिद्ध झाली तरच करता येते याची आठवणही करून दिली आहे. न्यायव्यवस्थेला  धक्का पोचवण्यासाठी  काही   वकिल जनहित याचिका दाखल करतात.

यांचीच वकिली काँग्रेस करते आहे. या साऱ्याला माध्यमंही मदत करत  आहेत असा   आरोप ही त्यांनी केला.

 

तसंच महाभियोगाचा वापर काँग्रेस राजकीय  हत्यारं म्हणून करते आहे असा आरोपही अरूण जेटलींनी केला आहे.  तसंच  कारावान मासिकात लिहून आलेलं जज लोया मृत्यू प्रकरण हे फेक न्यूजचं उदाहरण असल्याचंही अरूण जेटलींनी स्पष्ट केलं

आता या  सगळ्यानंतर   जज लोया प्रकरणाचं राजकारण कसं तापतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: April 20, 2018, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading