शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज!

शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज!

संसदेतून बाहेर पडताना या भेटीवर जेव्हा सोनिया गांधी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी फक्त नो कॉमेंट्स एवढचं उत्तर दिलं होतं.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवारांच्या खेळीची कल्पना कुणालाच लागत नाही असं दिल्लीच्या वर्तुळात म्हटलं जातं त्यामुळे या भेटीकडे संशयाने पाहिलं जातंय. या आधीही पंतप्रधानांनी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. त्यामुळे पवार मोदी भेटीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी या मोदी-पवार भेटीवर नाराज असल्याची माहिती काँग्रसमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चर्चेचा गाडा रुळावरून घसरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

संसदेतून बाहेर पडताना या भेटीवर जेव्हा सोनिया गांधी यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी फक्त नो कॉमेंट्स एवढचं उत्तर दिलं होतं. त्यावरूनही त्या नाराज असल्याचे संकेत मिळतात असं बोललं जातंय. पवारांनी पंतप्रधानांची 'चुकीच्या वेळेवर' भेट घेतली असं काँग्रेसला वाटतंय. या भेटीचा आणि नाराजीचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेवर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सत्तेची कोंडी फोडण्यासाठी आता नवा फॉर्म्युला, अशी असेल मंत्रिपदाची वाटणी

मोदी यांच्या भेटीनंतर काय म्हणाले पवार?

राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय कोंडी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत भेट घेतली. पवारांनी संसदेतील PM मोदींच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट तब्बल 45 मिनिटे झाली.

एका बाजूला राज्यातील सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बैठक होणार असताना त्याआधी आज संसदेत दुपारी साडेबाराच्या सुमारास पवारांनी मोदींची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार याबद्दल संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली होती. विशेषत: गेल्या काही दिवसात राज्यात शिवमहाआघाडीचे सरकार येणार अशी चर्चा सुरु असताना पवारांच्या या भेटीला प्रचंड महत्त्व आले होते. राज्यात भाजप आणि शिवसेना यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्व घडामोडींचे केंद्र शरद पवारच राहिले आहेत.

VIDEO : सत्ता स्थापनेबाबत सेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा

या भेटीनंतर पवारांनी मोदींसोबत कोणत्याही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. पवारांनी मोदींना पुण्यातील साखर परिषदेला येण्याचे आमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे पवारांसोबत बैठक सुरु असताना पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना बोलवून घेतले होते. त्यानंतर बैठक संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. पवार आणि मोदींची भेट झाल्यानंतर तातडीने मोदी-शहा यांची भेट झाल्यामुळे विविध तर्क लढवले जात आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 20, 2019, 4:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading