सर्वात मोठा चोर कोण हे काँग्रेसचं सरकार आल्यावर कळेल - अहमद पटेल

मध्यप्रदेशात इन्कमटॅक्स विभागाने घातलेल्या छाप्यांमध्ये 281 कोटींची रक्कम सापडल्याने खळबळ उडाली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 08:20 PM IST

सर्वात मोठा चोर कोण हे काँग्रेसचं सरकार आल्यावर कळेल - अहमद पटेल

नवी दिल्ली 9 एप्रिल : मध्यप्रदेशात सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छाप्यांवरून काँग्रेसचा राग अनावर झालाय. राजकीय कारणांवरून हे छापे भाजपनेच टाकायला लावले असा आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलाय. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसचं सरकार केंद्रात आल्यावर सर्वात मोठा चोर कोण आहे हे कळेल असं पटेल यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने या छाप्यांवरून भाजपला दोषी धरलंय तर काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा जमा केला होता असा आरोप भाजपने केला होता.

281 कोटी सापडले

मध्यप्रदेशात इन्कमटॅक्स विभागाने घातलेल्या छाप्यांमध्ये 281 कोटींची रक्कम सापडल्याने खळबळ उडालीय. आता या प्रकरणावर नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केलेल्या एका ट्विटवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्याच इशाऱ्यावरून हे छापे घातल्याचं सिद्ध होत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

मध्यप्रदेशात रविवार पहाटेपासून छापा सत्र सुरू आहे. बदल्या करून हा पैसा मिळविण्यात आला आणि त्यातून 281 कोटी रुपये मिळाले अशा अर्थाचं ट्विट कैलास विजयवर्गीय यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता केलं होतं. तर इन्कमटॅक्स विभागाने रात्री साडेसात वाजता अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढून त्यात सर्व माहिती दिली. त्यामुळे भाजपच्या नेत्याला आधीच कशी माहिती मिळाली असा प्रश्न आता काँग्रेसने विचारला आहे.

Loading...

मध्यप्रदेशात काय झालं?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Central Board of Direct Taxes (CBDT) ) च्या अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेशमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. 281 कोटींची रक्कम आणि बेनामी संपत्ती सापडल्याने खळबळ उडाली आहे. राजकारणी, व्यावसायीक, अधिकारी, व्यापारी, सामाजिक कामात सक्रीय असणारे मान्यवर अशा विविध लोकांवर CBDT च्या अधिकाऱ्यांनी छापे घातले होते. त्यात ही प्रचंड रक्कम आणि बेहिशेबी संपत्तीचा खुलासा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...