'काँग्रेसनं हिंदूंचा अपमान केला; नेते पळ काढून अल्पसंख्याकांची मदत घेत आहेत'

'काँग्रेसनं हिंदूंचा अपमान केला;  नेते पळ काढून अल्पसंख्याकांची मदत घेत आहेत'

काँग्रेसनं हिंदुंना बदनाम करण्याचं पाप केलं अशी टीका नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात बोलताना केली.

  • Share this:

वर्धा, 01 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्यातील जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मतांसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही थराला जातील. हिंदूंना बदनाम करण्याचं पाप हे काँग्रेसनं केलं आहे. काँग्रेसमुळे हिंदू बदनाम झाले. हिंदू दहशतवाद हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना केला. हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? हे पाप कुणी केलं? काँग्रेसच्या साऱ्या बाबी आता समोर येत आहेत. पण, काँग्रेसला आता पापापासून मुक्ती नाही. देशानं काँग्रेसला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेते देखील मैदान सोडून पळत असून त्यांनी अल्पसंख्याक मतदारसंघ निवडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं नाव घेणं मात्र टाळलं.


'50 वर्ष काँग्रेसने एप्रिल फूल बनवलं', मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 मुद्दे


वायनाडमधून राहुल गांधी मैदानात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता वायनाडमधून देखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 2008मध्ये वायनाड या मतदारसंघाची स्थापना झाली. 8 लाख मतदार संख्या असलेल्या वायनाडमध्ये 50 टक्के हिंदु, 28.65 टक्के मुस्लिम आणि 21 टक्के ईसाई आहेत. 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं विजय मिळवला होता. काँग्रेस खासदार एम. एल. शहनवाझ यांचं निधन झाल्यामुळे सध्या वायनाडची जागा रिकामी आहे. 2009मध्ये काँग्रेसला 50 टक्के मिळाली होती. तर, 2014मध्ये काँग्रेसला 41 टक्के पेक्षा जास्त मतं मिळाली होती.2014मध्ये काँग्रेसला 20,870 मताचं मताधिक्य मिळालं होतं. या दोन्ही वेळी सीपीएमला पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवाय, राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे देखील आता डावे नाराज आहेत.


'मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या