मराठी बातम्या /बातम्या /देश /

'नसबंदी केलेल्या नवरदेवासारखी माझी स्थिती'; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

'नसबंदी केलेल्या नवरदेवासारखी माझी स्थिती'; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

  मागील निवडणुकीतही काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला होता. पण, भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन केले होते

मागील निवडणुकीतही काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला होता. पण, भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन केले होते

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणण्यासाठी झटणारे गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सध्या काँग्रेसवर नाराज आहेत.

    गांधीनगर, 14 एप्रिल : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणण्यासाठी झटणारे पाटीदार समाजाचे नेते आणि गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) सध्या काँग्रेसवर नाराज आहेत. 'माझी स्थिती सध्या नसबंदी केलेल्या नवविवाहित वरासारखी झाली आहे,' असे उद्गार काढून, पक्षश्रेष्ठी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. यंदा म्हणजेच 2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वी पक्षांतर्गत कलह असाच वाढत गेला, तर तो थांबवणं काँग्रेसला कठीण जाणार आहे. या संदर्भातलं वृत्त एशियानेट न्यूजनं प्रसिद्ध केलं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतही गेल्या काही वर्षांतला पराभवाचा सिलसिला कायम राहिल्याने काँग्रेससमोरची आव्हानं वाढतच चालली आहेत. एकदा ठेच लागल्यानंतरही काँग्रेस पक्षात सुधारणा होत नसल्याचं दिसून येत आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये अंतर्गत कलह, गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाला पोखरलं आहे. यामुळे काँग्रेसचा भौगोलिक आलेख मर्यादित झाला आहे. आता गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संकटात आल्याचं दिसून येत आहे. एका मीडिया हाउससोबत बोलताना हार्दिक पटेल यांनी अनेक प्रश्नांवर मत मांडलं आहे. ते सांगतात, 'खोडालधाम ट्रस्टचे अध्यक्ष आणि पाटीदार समाजाचे नेते नरेश पटेल यांना प्रत्येक पक्ष आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांच्याबद्दल निर्णय घेण्यासाठी काँग्रेसला इतका वेळ का लागत आहे, हे समजू शकत नाही. हा संपूर्ण पाटीदार समाजाचा अपमान आहे. मला पक्षाच्या कोणत्याही बैठकीत बोलावलं जात नाही. तसंच कोणत्याही निर्णयात माझं मत विचारलं जात नाही. माझा सल्लाही घेतला जात नाही. याला काहीच अर्थ नाही.' हे ही वाचा-Company Gifted Cars to employees : कंपनी कर्मचाऱ्यांवर खुश! तब्बल 100 जणांना मारुती कार दिली भेट, म्हणाले.. हार्दिक पटेल या पाटीदार समाजाच्या तरुण नेत्यानं गुजरात सरकारविरुद्धच्या आंदोलनाचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. त्याला काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः पक्षामध्ये घेऊन आले आणि 2020 मध्ये गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष केलं. अशा नेत्याला एकटं पाडलं गेल्यामुळे आणि ते निराश झाल्यामुळे गुजरातच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पाटीदार हिंसाचार प्रकरणात हार्दिक पटेल यांना हायकोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने दोनच दिवसांपूर्वी स्थगितीचा आदेश दिला. त्यामुळे हार्दिक पटेल यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी आगामी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. परंतु अशा प्रकारे त्यांची नाराजी वाढणं काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे पाटीदार समाज नाराज होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोगावे लागण्याची शक्यता आहे, असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. आधी इंद्रनील राजगुरू (Indranil Rajyaguru) आणि वाशरंभाई सगथिया (Vasram Sagathia) अशा काही दिग्गज नेत्यांनी पक्षापासून फारकत घेतली. आता हार्दिक पटेलही नाराजीची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाला इशारा असल्याचं बोललं जात आहे.
    First published:

    Tags: Gujrat, Young Congress

    पुढील बातम्या