कर्नाटक, 01 मे : ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही त्याप्रमाण काँग्रेस ही सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि आतापर्यंत संविधानासोबत काँग्रेसनेच जास्त चेष्टा केल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीये.
कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्या आज तीन जाहीर सभा झाल्या त्यापैकी बेळगाव मधील चिक्कोडी मतदार संघातील सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसंच जोपर्यंत भाजपचा झेंडा आहे तोपर्यंत संविधानाला धोका नाही असं सांगत तुमचे मुख्यमंत्री कसले आहेत ते कायम झोपलेलेच असतात अशी बोचरी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर केलीय.
या सभेसाठी सीमा भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर गुरुवारीही पंतप्रधान मोदी यांच्या तीन जाहीर सभा होणार असून बेल्लारी मतदारसंघातही त्यांची सभा होणार आहे रेड्डी बंधूंना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे त्या मतदारसंघात पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार याकडे कर्नाटक राज्याचे लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi