Home /News /national /

कॉंग्रेस सरकारकडून शाळांमधील सावरकरांचे फोटो काढण्याचा आदेश

कॉंग्रेस सरकारकडून शाळांमधील सावरकरांचे फोटो काढण्याचा आदेश

सरकारच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा आदेशही देण्यात आला आहे

    राजस्थान, 13 फेब्रुवारी : राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय दिला आहे. राजस्थान सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भातील एक पत्रक अशोक गहलोक यांच्या सरकारने सर्व शाळांमध्ये जारी केलं आहे. याशिवाय सरकारच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. भाजपने कॉंग्रेस सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप यावेळी भाजपने केला आहे. तर राज्यातील शाळांमध्ये सावरकर आणि पंडित उपाध्याय यांचे फोटो काढून देणार नसल्याचा इशारा राजस्थानमधील भाजप नेत्यांनी दिला आहे. राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी राजस्थान सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेस सरकारला राज्यातील सरकारी शाळांमध्ये केवळ एकाच परिवारातील व्यक्तींचे फोटो पाहायचे आहेत. भाजप याला तीव्र विरोध करीत आहे, असे त्या म्हणाल्या. राजस्थानच्या गहलोत सरकारने सरकारी शाळांमधील सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो काढून त्याऐवजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली होती तेव्हा सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र शाळेतील वर्गात यांचे फोटो लावण्याचे औचित्य नसल्याचे राजस्थान सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे फोटो काढण्याचे आदेश राजस्थान राज्य सरकारने दिले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, BJP and congress, Congress, India, Narendra modi, Rajasthan, भाजप, राहुल गांधी

    पुढील बातम्या