मराठी बातम्या /बातम्या /देश /

काँग्रेसला बसणार आणखी एक हादरा, भाजप या राज्यातही सत्ता उलथवणार?

काँग्रेसला बसणार आणखी एक हादरा, भाजप या राज्यातही सत्ता उलथवणार?

कधी काळी सचिन पायलट हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून समजले जात होते. मात्र नंतर त्यांच्यात दुरावा वाढत गेला असं बोललं जात आहे.

कधी काळी सचिन पायलट हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून समजले जात होते. मात्र नंतर त्यांच्यात दुरावा वाढत गेला असं बोललं जात आहे.

कधी काळी सचिन पायलट हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून समजले जात होते. मात्र नंतर त्यांच्यात दुरावा वाढत गेला असं बोललं जात आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 12 जुलै: मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार खेचल्यानंतर आता भाजपने राजस्थानवर (Rajasthan Government) आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि तरूण नेते सचिन पायलट ( Sachin Pilot) हे भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली आहे. सचिन पायलट यांना 20 आमदारांचं समर्थन असल्याचंही बोललं जात असल्याने राजस्थानामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सचिन पायलट दिल्लीत आले असून त्यांनी सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट घेतली. मात्र पायलट हे कमालीचे नाराज असून बंडाच्या पावित्र्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीपासूनच सचिन पायलट हे पक्षनेतृत्वावर नाराज होते. पक्षाने आपल्याला मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं असं त्यांचं मत आहे. मात्र नंतर त्यांची समजूत घालून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतरच काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. सध्या देशात कोरोनाचं संकट आहे. सगळीच सरकारे त्यासाठी काम करत आहेत. राजस्थानात या राजकीय अस्थिरतेमुळे कोरोनाच्या लढाईलाही धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन पायलट नेमकी काय भूमिका घेतात हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. मात्र ते बंडाच्या तयारीतच आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कधी काळी सचिन पायलट हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून समजले जात होते. मात्र नंतर त्यांच्यात दुरावा वाढत गेला असं बोललं जात आहे. पंतप्रधान मोदी असताना चीनने जमीन हिसकावून घेतलीच कशी? राहुल गांधी पुन्हा बरसले सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी रात्री 8 वाजता सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे.
First published:

पुढील बातम्या