Elec-widget

काँग्रेसच्या योजनेचे 72 हजार रूपये कसे मिळणार? या नंबरवर कॉल करा आणि जाणून घ्या

काँग्रेसच्या योजनेचे 72 हजार रूपये कसे मिळणार? या नंबरवर कॉल करा आणि जाणून घ्या

गरिबांच्या खात्यात 72 हजार कसे जमा होणार? या प्रश्नाच्या उत्तराकरता काँग्रेसनं मोबाईल नंबर जारी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : 'न्याय' अर्थात न्यूनतम आय योजना! काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'न्याय' योजनेतंर्गत देशातील गरिबांच्या खात्यात वर्षाला 72 हजार जमा करण्याचं आश्वासन दिलं. शिवाय, जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील मी आपल्या दिलेल्या वचनावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यांच्या या योजनेवरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवाय अनेक सवाल देखील उपस्थित केले. अनेकांना देखील काँग्रेस इतका पैसा आणणार कुठून? असा प्रश्न पडला आहे. याबाबत काँग्रेसनं आता नवी शक्कल शोधून काढली आहे. काँग्रेसनं आपल्या सोशल मीडियासाईटवर एका मोबाईल नंबर दिला आहे. ज्यावर फोन केल्यानंतर एका महिलेचा आणि पुरूषाचा आवाज ऐकू येतो. यामध्ये महिला काँग्रेसच्या न्याय योजनेवर प्रश्न उपस्थित करते. तर, पुरूष तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो.

8471006006 या मोबाईल नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव येईल. हा नंबर टोल फ्री आहे. 'न्याय' योजनेतंर्गत मिळणारे पैसे हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.


प्रियांका गांधींचं असं आहे ‘मिशन वायनाड’


Loading...

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. 2014मध्ये प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा होतील असं सांगितलं होतं. ते पैसे आता आहेत कुठे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. नरेंद्र मोदी सरकारनं श्रीमंतांना मोठ्या प्रमाणावर सुट दिली आहे. तो पैसा आम्ही गरिबांमध्ये वाटू असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, न्याय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्राची गरज नसून बीपीएल आणि आधार कार्डवर काम होईल असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या या योजनेवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत.


VIDEO : तरुणासोबत पळून गेली होती तरुणी, खांद्यावर पतीला बसवून काढली गावकऱ्यांनी धींड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...