Lok Sabha Election 2019 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर, माणिकराव ठाकरे मैदानात!

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर, माणिकराव ठाकरे मैदानात!

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 9 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 9 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर,नंदुरबारमधून के.सी. पडवी,वर्ध्यातून चारुलता ठोकस आणि धुळ्यातून कुणाल रोहिदास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीकरता आघाडी केली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये औरंगाबाद आणि नगरच्या जागेवरून तिढा असून तो अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही मुद्यांवर मंगळवारी सकाळी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चर्चा देखील झाली.

काँग्रेसची दुसरी यादी

महाराष्ट्र, नंदूरबार - के. सी. पडवी

महाराष्ट्र, धुळे - कुणाल रोहिदास पाटील

महाराष्ट्र, वर्धा - चारूलता ठोकस

महाराष्ट्र, यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे

महाराष्ट्र, दक्षिण-मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड

महाराष्ट्र, शिर्डी - भाऊसाहेब कांबळे

महाराष्ट्र, रत्नागिरी - नविनचंद्र बांदिवडेकर

केरळ, अलपुझा - शानिमोल उस्मान

केरळ, अत्तिंगल - अंदर प्रकाश

पहिल्या यादीतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का

2014 प्रमाणे यावर्षी देखील भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के दिले. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर, माढातील राष्ट्रवादीचे बडे नेते आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील देखील बुधवारी अर्थात उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर, भाजपचे पुण्यातील खासदार संजय काकडे यांनी देखील आता काँग्रेस प्रवेश केला आहे.

दाऊद इब्राहिमवरून प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

बीडमध्येही राष्ट्रवादीत बंडखोरीची लागण

लोकसभेच्या निवडणुकांना आता काही दिवस राहिलेले असताना मुख्य विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी उफाळून आली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या राजकीय विरोधामुळे हा जिल्हा कायम चर्चेत असतो. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी धनंजय मुंडे कायम प्रयत्न करत असतात मात्र आता या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नाराजीमुळे धनंजय मुंडे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 11:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading