काँग्रेसच्या बैठकीत भूकंप, ज्येष्ठ नेत्याने दिली राजीनामा देण्याची धमकी

काँग्रेसच्या बैठकीत भूकंप, ज्येष्ठ नेत्याने दिली राजीनामा देण्याची धमकी

काही नेते हे भाजपला मदत करत असल्याचा आरोपच राहुल गांधींनी केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची (CWC Meeting) बैठक सुरू आहे. पण, या बैठकीला आता वादळी स्वरुप प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये  राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विरोधीपक्षासोबत लढत असताना काही काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना यांना पत्र का लिहिले. काही नेते हे भाजपला मदत करत असल्याचा आरोपच राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत पक्षाला इशारा दिला.

'भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा सिद्ध झाला तर पदाचा राजीनामा देईल' असं गुलाम नबी आझाद यांनी या बैठकीत ठणकावून सांगितलं. त्यांच्या विधानामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पाहण्यास मिळत आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग सुरू झाले आहे. सोनिया गांधी यांची जर इच्छा नसेल तर राहुल गांधी यांनी समोर यावं अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे काही काँग्रेसचे नेते हे सोनिया गांधींनीच अध्यक्ष राहावे, असं बोलून दाखवलं आहे.

विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला इशारा

दरम्यान, 'गांधी घराण्यानेच नेतृत्त्व करावे. सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे राहुल गांधी हे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहे.

मुळात राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला होता.  उद्या जर राहुल गांधी यांनी निर्णय घेतला की, सरकारमधून बाहेर पडावे तर आम्ही बाहेर पडू' असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

तसंच, 'जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या सहमतीनेच सरकार स्थापन झाले आहे. उद्या जर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सांगितले तर आम्हाला एक मिनिटही लागणार नाही', असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

'आमच्या पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे. मला वाटते गांधी परिवाराकडे नेतृत्व असावे, त्यांच्यातच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता आहे. आमच्या इथे भाजप पक्षासारखी हुकुमशाही नाही. जे दोन व्यक्ती निर्णय घेतील ते स्वीकारावे लागेल', असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला.

Published by: sachin Salve
First published: August 24, 2020, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading