नवी दिल्ली 15 डिसेंबर: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament session) रद्द केल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज दिली. दिल्लीत कोरोनाचा प्रसार वाढतो आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करण्यात आली नसल्याचे सांगत काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे अशाच घटना होत असतील तर लोकशाही टीकणार कशी असा सवाल काँग्रेसने केला आहे.
कोरोना काळात NEET/JEE व IAS सारख्या परीक्षा घेतल्या जात आहेत. शाळांमध्ये वर्ग, विद्यापीठांमध्ये परीक्षा शक्य आहेत. बिहार-बंगालमध्ये निवडणूकीच्या प्रचार सभा शक्य आहेत. मग संसदेचे हिवाळी अधिवेश का नाही? जर संसदेत जनतेचे मुद्देच मांडले जाणार नाही तर लोकाशाहीचा अर्थ काय राहील? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.
अनेक जणांनी कोरोनाच्या प्रसारामुळे अधिवेशन घेण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती त्यामुळेच अधिवेशन रद्द केल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जातंय. पण विरोध पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
Many leaders have advised me that we can go for Budget Session directly as we completed a session recently. I would like to ask Congress why they had asked for an earlier conclusion of September session & demanding another session now: Union Minister of Parliamentary Affairs https://t.co/0nNtlzMXTa
— ANI (@ANI) December 15, 2020
आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सुरू असलेलं शेतकऱ्यांंचं आंदोलन यामुळे सरकार घाबरलं असून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंम्मत सरकारमध्ये नाही असंही काँग्रेसने म्हटलं आहे.