मोदींवरील 'चायवाला' ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत

या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 09:00 AM IST

मोदींवरील 'चायवाला'  ट्विटमुळे  काँग्रेस अडचणीत

22 नोव्हेंबर:  एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच काँग्रेस एका टि्वटमुळे अडचणीत आली आहे. या ट्विटमध्ये मोदींच्या 'चायवाला' प्रतिमेचा वाद उकरून काढण्यात आला आहे.

युथ काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हँडलवर एक छायाचित्र (मीम) पोस्ट करण्यात आले. 'युवा देश' या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हॅंडलवर हे मीम पोस्ट करण्यात आले. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या मीमवर आक्षेप घेतला. मात्र काँग्रेसनेही त्यावर त्वरित स्पष्टीकरण दिले. वादानंतर 'युवा देश'ने हे टि्वट हटवले. 'युवा देश' या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हॅंडलवर हे मीम पोस्ट करण्यात आले. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते. हे मीम 'गरीबविरोधी' असल्याचे रुपाणी यांनी म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या पक्षाच्या अशा कृतीचं समर्थन करणार का, असा सवालही रुपाणी यांनी केला आहे.

काँग्रेसच्या या ट्विटवर उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र मौन बाळगून आहेत. हिवाळी अधिवेशन लवकर घ्या, असं ट्विट त्यांनी केलंय. पण आपल्या युवक काँग्रेसच्या या घोडचुकीवर ते गप्प आहेत. थोड्याच दिवसांत ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असा अंदाज आहे. पण तरीही या बाबतीत ठोस भूमिका घेणं त्यांनी टाळलंय. आणि यावरून भाजपकडूनच नाही तर समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...