... आणि काँग्रेसनं मोदी सरकारचं केलं अभिनंदन

भारताच्या मिशन शक्तीचे काँग्रेसनं कौतुक करत मोदी सरकारचे अभिनंदन करणारे ट्वीट केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 03:17 PM IST

... आणि काँग्रेसनं मोदी सरकारचं केलं अभिनंदन

नवी दिल्ली, 27 मार्च : देशासाठी बुधवारचा अभिमानाचा दिवस ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी भारत अंतराळात महाशक्ती ठरल्याचे सांगितलं. लो अर्थ ऑर्बिटमध्ये एका लाइव्ह सॅटेलाईटला भारताच्या अँटी सॅटेलाइटने पाडलं. त्यानंतर काँग्रेसनं ट्विटरवरून इस्त्रो आणि भारत सरकारचं याबद्दल अभिनंदन केलं आहे.

काँग्रेसनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं आणि सरकारचं या कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. भारतीय अंतराळ संशोधनाला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी इस्रोची स्थापना केली. इंदिरा गांधींनी नेहमीच देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली होती.भारतानं केलेल्या मिशन शक्तीबद्दल मोदींनी सांगितले की, ही कामगिरी मिशन शक्तीच्या अंतर्गत होती. भारताने आपली ताकद दाखवण्यासाठी हे पाऊल उचललं. यामुळे भारताचं लष्कर आणखी मजबूत झालं. याचा फायदा लष्कराला झाला आहे.

Loading...

अंतरिक्षात 300 किमी अतंरवरील सॅटेलाइट भारतानं उद्ध्वस्त केला. भारतानं स्वत:चाच सॅटेलाइट नष्ट केला. यातून भारतानं अंतराळातील आपली पोहोच जगातील देशांना दाखवली आहे. अंतराळातील सॅटेलाइट पाडण्यासाठी खूप शक्ती लागते. सॅटेलाइट पाडण्याचं किंवा अशा प्रकारची चाचणी ही युद्धावेळी वापरली जाते. शत्रू राष्ट्रावर धाक बसवण्यासाठी भारतानं मिशन शक्ती केले. ही चाचणी करत असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियम किंवा संधीचे भारतानं उल्लंघन केलं नाही.

आताच्या काळात अंतराळ आणि सॅटेलाइटचं महत्त्व वाढले आहे. त्याचं महत्त्व ओळखून भारतानं मिशन शक्ती केलं. अंतराळात DRDO च्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केलेल्या मिशन शक्ती बद्दल मोदींनी अभिनंदन केलं आहे. मिशन शक्ती एक कठिण मोहिम होती. हा पराक्रम केल्यानंतर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश झाला आहे.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2019 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...