काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवं आव्हान

काँग्रेसनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 10:25 AM IST

काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवं आव्हान

नवी दिल्ली, 01 एप्रिल : काँग्रेसनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. हिंम्मत असेल तर नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवावी असं आव्हान आता काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यावर भाजपनं जोरदार टीका केली. शिवाय, पराभव दिसू लागल्यानं आता काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लढत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. या साऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता भाजप काँग्रेसच्या या आव्हानाला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत राहुल गांधी यांनी निर्णय घेतल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.


केरळमधून डाव्याचं राहुल गांधी यांना आव्हान

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यावर आता उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री के. विजयन यांना पटलेला नाही. काँग्रेसच्या घोषणेनंतर त्यांनी त्यावर टीका केली आहे. शिवाय, आपली नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी डाव्यांना आव्हान दिलं असून त्यांनी भाजपाविरोधात लढायला हवं होतं. पण, ते आता डाव्यांना आव्हान देत आहेत अशी प्रतिक्रिया के. विजयन यांनी दिली आहे. शिवाय, प्रकाश करात यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.


Loading...

दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी! इतिहासाची पुनरावृत्ती होणार?


वायनाडमधून राहुल गांधी मैदानात

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळ या दोन राज्यातील मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते ए.के.एन्टनी यांनी दिली. याआधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीदेखील यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवणार आहे.

केरळमधली वायनाडची जागा सध्या रिक्त आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडच्या जागेवर कोणीही उमेदवार नव्हता. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनीच निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.


SPECIAL REPORT: कधी संपणार प्रदेश काँग्रेसमधल्या लाथाळ्या?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...