'EVM छेडछाडीत तुम्हीही सामील?' काँग्रेस उमेदवाराचे थेट सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह

उदित राज यांनी थेट सुप्रीम कोर्टावरच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:59 PM IST

'EVM छेडछाडीत तुम्हीही सामील?' काँग्रेस उमेदवाराचे थेट सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली, 22 मे : दिल्लीतील काँग्रेस उमेदवार उदित राज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी, अशी सुप्रीम कोर्टाची इच्छा का नाही. सुप्रीम कोर्टही या गडबडीत सामील आहे काय?' असं म्हणत उदित राज यांनी थेट सुप्रीम कोर्टावरच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

उदित राज यांनी थेट सुप्रीम कोर्टाला लक्ष्य केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. 'निवडणूक प्रक्रियेमुळे जर तीन महिन्यांपासून सर्व सरकारी कामं बंद पडली असतील तर निकालाला दोन-तीन दिवस लागले तर काय फरक पडतो,' असं उदित राज यांनी म्हटलं आहे.

कोण आहे उदित राज?

निवडणुकीच्या काळात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यातही एखाद्या लोकप्रतिनिधीचे तिकीट कापल्यानंतर तर तो लगेचच दुसऱ्या पक्षाची वाट पकडताना दिसत आहे. दिल्लीतील भाजप खासदार उदित राज यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला.

भाजपचे दिल्लीतील खासदार उदित राज यांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या उदित राज यांनी भाजपला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर अखेर त्यांनी अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Loading...

VVPAT बद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल

प्रत्येक विधानसभेमधील 5 VVPATच्या स्लीपची मोजणी करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दिल्लीतील एका लोकसभा मतदार संघामध्ये 10 विधानसभा येतात. त्यामुळे दिल्लीत 50 VVPATच्या स्लीपची मोजणी होईल तर महाराष्ट्रामध्ये काही लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा आहेत तिथे 30 स्लीपची मोजणी होईल. अरुणाचलमध्ये एका लोकसभा मतदार संघात 30 विधानसभा आहेत. त्यामुळे तिथे 150 VVPATच्या स्लीपची मोजणी होणार आहे.

महाराष्ट्रातील 2325 मतदान केंद्र असणाऱ्या बीड लोकसभेसाठी 169 मतमोजणी फेरीसंख्या असणार आहे. 37 उमेदवार असल्यामुळे 3 VVPAT मशीन आहेत. त्याची प्रत्येकवेळी तपासणी करावी लागणार असल्याने राज्यातील बीड मतदारसंघाचा निकाल सर्वात उशिरा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशभरातील त्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा संख्येच्या आधारावर मोजणी होणार आहे. पण प्रत्येक विधानसभेसाठी 5 असं सूत्र आहे.


VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Congress
First Published: May 22, 2019 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...