आपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल

आपल्या खास लोकांनाच न्याय व्यवस्थेत घुसवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केलाय. तर काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच नाही असं उत्तर केंद्रानं दिलंय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2018 07:07 PM IST

आपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल

नवी दिल्ली,ता.26 एप्रिल: आपल्या खास लोकांनाच न्याय व्यवस्थेत घुसवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केलाय. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केएम जोसेफ यांच्या नियुक्तीची शिफारस नाकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा त्याचच प्रतिक असल्याचा आरोपही सिब्बल यांनी केलाय. न्याय व्यवस्था धोक्यात आली आहे असा आरोपही त्यांनी केला.

जस्टिस केएम जोसेफ यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळच त्यांना डावलण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठीच्या कॉलेजीयम पद्धतीनुसार जोसेफ आणि ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारनं मल्होत्रांच्या नावाला मंजूरी दिली तर जोसेफ यांचं नाव फेरविचारासाठी पाठवून दिलं.

फेरविचारासाठी केंद्र नाव पाठवू शकते - सरन्यायाधीश

इंदू मल्होत्रा यांच्या नियुक्तीचा वादही आता कोर्टात गेलाय. मल्होत्रांना शपथ घेण्यापासून रोखण्यात यावं या मागणीसाठी ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंह यांनी कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी अशा याचिकांबाबत नाराजी व्यक्त केली. कॉलेजियमनं केलेली शिफारस केंद्र सरकार फेरविचारासाठी पाठवू शकते असं मत त्यांनी व्यक्त केलं. इंदू मल्होत्रा शुक्रवारी न्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.

काय आहे सरकारचं म्हणणं?

जस्टिस जोसेफ यांच्यापेक्षा देशातल्या विविध न्यायालयातले 41 न्यायाधीश सेवाज्येष्ठता क्रमवारीत वर आहेत. त्यामुळं त्यांच्यावर अन्याय होईल असं मत कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं. न्यायाव्यवस्थेबद्दल काँग्रसला बोलण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close