Pulwama : 'देश दु:खात होता आणि पंतप्रधान फोटोशूट करत होते,' मोदींवर हल्लाबोल

पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं भाजपला टीका केली असून मोदींच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 01:44 PM IST

Pulwama : 'देश दु:खात होता आणि पंतप्रधान फोटोशूट करत होते,' मोदींवर हल्लाबोल

दिल्ली, 21 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यावरून काँग्रेसनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला आहे. 'पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यावेळी सारा देश दु:खात होता. रडत होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र फोटो काढण्यात मग्न होते. या साऱ्या परिस्थितीचा पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष अमित शहा फायदा घेत आहेत. जवान शहीद झाल्यानंतर प्रचार सभांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून भाजपनं राष्ट्रीय दुखवटा देखील घोषित नाही केला,' अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

'हल्ल्यानंतर सारा देश दु:खात होता. पण, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जीम कॉर्बेट पार्कमध्ये फोटो काढण्यात मग्न होते. अशा रितीनं वागणारा जगात दुसरा पंतप्रधान मी पाहिला नाही.' अशी टीका देखील यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी केली आहे. 'पुलवामा येथे जवानांच्या शरीराचे तुकडे एकत्र केले जात होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्वत:चा जयजयकार करत होते. काँग्रेसला निशाणा बनवत होते.'


Loading...

">

परदेश दौऱ्यावर देखील टीका

यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर देखील प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषदेमध्ये रणदीप सुरजेवाला यांनी दहशतवाद्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणलीच कशी? असा सवाल देखील केला आहे. जवानांसाठी विमानाची का नाही व्यवस्था केली गेली? शिवाय, जैश - ए - मोहम्मदच्या धमक्यांकडे दुर्लक्ष का केलं गेलं? असे एक ना अनेक सवाल यावेळी सुरजेवाल यांनी केले आहे.

40 जवान शहीद

14 फेब्रुवारी झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, भारतानं देखील दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे असा सरळ इशारा दिला आहे. शिवाय, पाकिस्तानच्या देखील मुसक्या आवळायला भारतानं सुरूवात केली आहे.

VIDEO : आक्रमक भुजबळ मोदी-फडणवीसांवर बरसले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...