भाजपला अंगावर घेण्याचा 'महाराष्ट्र पॅटर्न' काँग्रेस देशभर राबविणार!

भाजपला अंगावर घेण्याचा 'महाराष्ट्र पॅटर्न' काँग्रेस देशभर राबविणार!

यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध मोठी आघाडी निर्माण करावी असा प्रयत्न काँग्रेसचा आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 02 डिसेंबर: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने नवा इतिहास घडला. भाजपच्या विरोधात टोकाची विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याने राजकारणात नवं पर्व सुरु झालं. भाजपच्या विरोधात एकत्र येत त्या पक्षाचा वारू रोखता येतं हे स्पष्ट झालं. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून काँग्रेसनं भाजपविरोधात राजधानी दिल्लीत मोठ्या रॅलीचं आयोजन केलंय. काँग्रेस शक्तिप्रदर्शन करून विरोधी पक्षाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या 14 डिसेंबरला राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीत समान विचारधारेच्या पक्षांना आमंत्रित करण्यात येणार आहे. बिहार मधून राष्ट्रीय जनता दल, पश्चिम बंगालमधून काँग्रेस, केरळ मधून डावे पक्ष तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेला आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आलीय.

मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट राज्य सरकारच्या रडारवर, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर लक्ष

महाराष्ट्रात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आलीय. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध मोठी आघाडी निर्माण करावी असा प्रयत्न काँग्रेसचा आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले तेव्हा सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते. नंतर मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. आता काँग्रेस पुन्हा एकदा सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेय.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा पुणे मुक्कामी

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या प्रयोगाची सुरुवात झाली. भाजपविरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यानंतरही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. या महाराष्ट्र पॅटर्नची देशभर चर्चा सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यात येत आहेत. हे दोनही दिग्गज नेते पोलिसांच्या एका परिषदेसाठी पुण्यात येत असून त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

'पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला'

देशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. 2014 पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत.

देशभरातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा, राज्य स्तरावर पोलीस दलांमध्ये करायचे आवश्यक बदल, पोलीस आणि गुप्तचर संस्थांमध समन्वय वाढवणं असे अनेक विषय या बैठकीत चर्चेला येणार आहेत. यंदा ही बैठक पुण्यात 6 ते 8 डिसेंबर अशी होणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 09:37 PM IST

ताज्या बातम्या