काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत, मात्र सत्तावाटपाचा फॉर्म्युला अजुनही गुलदस्त्यातच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत, मात्र सत्तावाटपाचा फॉर्म्युला अजुनही गुलदस्त्यातच

सत्तावाटप कसं राहिल, मुख्यमंत्रिपदाचं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मुंबईत शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर सांगण्यात येतील.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तावाटपाची चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आलीय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दिल्लीतली चर्चा आता संपली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झाल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्विराज चव्हाण यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, आता यापुढे मुंबईत चर्चा होणार आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी ज्या पक्षांसोबत आघाडी केली होती त्या सर्व पक्षांशी चर्चा होणार असून काँग्रे आणि राष्ट्रवादी शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे अशी माहितीही त्यांनी दिलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चव्हाण यांनी ही माहिती दिली. सत्तावाटप कसं राहिल, मुख्यमंत्रिपदाचं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मुंबईत शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर सांगण्यात येतील असं सांगत त्यांनी सत्तापाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच ठेवला. दिल्लीत असलेले सगळे नेते आता मुंबईकडे निघाले आहेत.

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना धनंजय मुंडेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाराष्ट्रातल्या सत्तेचा पेच सोडविण्यासाठी गेली काही दिवस दिल्लीत बैठकांचा रतीब सुरू होता. सगळ्या घडामोडींचं केंद्र हे राजधानी दिल्ली झालं होतं. त्याचं कारण म्हणजे सगळी चर्चा ही सोनिया गांधींभोवती फिरत होती. शिवसेनेसोबत काँग्रेसने यावं यावं यासाठी सगळेच ज्येष्ठ नेते बैठकांवर बैठका करत होते. त्यातच संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवारही दिल्लीतच होते. त्यामुळे सर्व घडामोडी दिल्लीतच केंद्रीत झाल्या होत्या. या बैठकांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यास मान्यता दिली आणि सत्तेचा नवा फॉर्म्युलाही तयार झाला. आता चर्चेच्या फेऱ्या या शिवसेनेसोबत होणार असल्याने उद्यापासून (शुक्रवार 22 नोव्हेंबर) सगळी चर्चा मुंबईत होणार आहे.

काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या 11 मंत्र्यांचाही निर्णय घेतला आहे. संभाव्य मंत्र्यांची यादीही तयार करण्यात आलीय. नेत्यांना तातडीने मुंबईत जाता यावं यासाठी काँग्रेसने एक चार्टड विमानही बुक केलं असून ते दिल्ली विमानतळावर तयार ठेवण्यात आलंय. हे विमान नेत्यांना मुंबईत जाण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेत शिवसेनेनं केली स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

उद्या मुंबईत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावलीय. त्यात उद्धव ठाकरे हे आमदारांना महत्त्वाचा संदेश देणार आहेत. काँग्रेसने अद्याप आपला गटनेताच निवडला नसून उद्या आमदारांची बैठक होणार आहे त्यात नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे.

त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याला अंतिम रुप दिलं जाणार आहे. काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र देणार नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार आहे. दोनही पक्ष नव्याने पत्र तयार करून त्यावर आमदारांच्या सह्या घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या