बंगळूरू, 14 मार्च : लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये देखील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसनं जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. यामध्ये काँग्रेस 20 तर जेडीएस 8 जागांवर लढणार आहे. लोकसभेच्या 28 जागांपैकी जेडीएसनं 12 जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, अखेर 8 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि जेडीएस प्रमुख एच. देवेगौडा यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 10, जेडीएसला 2 आणि भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या. पण, यंदा मात्र भाजपविरोधात विरोधकांनी एकी केली असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
भाजप,शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे 'पाळणाघर' होऊ नये - उद्धव ठाकरे
भाजपला 22 जागा जिंकण्याचा विश्वास
भाजपचे कर्नाटकमधील नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी भाजप 22 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच 22 जागा जिंकल्यानंतर कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करेल असा देखील दावा देखील त्यांनी केला आहे. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर देखील भाजपला काँग्रेस आणि जेडीएसनं सत्तेपासून दूर ठेवलं होतं. हे सारं प्रकरण न्यायालयामध्ये देखील गेलं होतं. त्यामुळे केवळ अडीच दिवसांमध्ये येडीयुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता.
कोण कुठून लढणार? आतापर्यंत काँग्रेसकडून 36 उमेदवार जाहीर!
काँग्रेसकडून 36 उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली. नागपूरमधून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर हा भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी मोठी लढत पाहायाला मिळणार आहे. तसंच मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे आणि गडचिरोलीतून डॉ.नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमधील बहराइचमधून सावित्राबाई फुले, मुरादाबाद राज बब्बर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने 15 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत काँग्रेसने 36 उमेदवार जाहीर केले आहे.
SPECIAL REPORT : माढ्याचा तिढा, कुणाचा खोडा?