मराठी बातम्या /बातम्या /देश /Corona स्थितीवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर वार, देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार

Corona स्थितीवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर वार, देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होत आहे. देशभरातील कोरोनाच्या या संकटावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, 20 एप्रिल: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस (Congress) आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या या संकट काळात काँग्रेस नकारात्मकता पसरवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि मनमोहन सिंग पत्र लिहून सल्ला दिला. मात्र, यांनी याच सूचना महारष्ट्र सरकारने का दिल्या नाहीत?

आज कोरोना संसर्गाच्या एकूण टक्केवारीनुसार 35 ते 40 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील 35 ते 37 टक्के आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग होता मग त्यावेळी राज्य सरकारने तयारी का केली नाही? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

वाचा: 'महाराष्ट्रात Lockdown लागणार नाही तर...' मोदींच्या आवाहनानंतर राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं, असं दिसत आहे की, "काँग्रेस आणि गांधी परिवार नकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. प्रियंका गांधींना विचारु इच्छितो की, कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीसंदर्भात महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली का? तेथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं का? कोरोनामुळे एकूण मृत्यूंपैकी 38 ते 40 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत."

प्रियंका गांधींनी मोदींवर केली होती टीका

देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोनामुळे लोक मृत्यूमुखी पडत आहेत आणि ते मोठ मोठ्या सभांमध्ये जाऊन हसत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ आपली प्रतिमा चमकवण्याच्या मागे लागलेलं आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Devendra Fadnavis, Priyanka gandhi