दिल्ली निवडणुकांचे वेध : आज भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार!

दिल्ली निवडणुकांचे वेध : आज भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार!

येत्या 8 फेब्रुवारी रोजी 70 जागांसाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी : सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून त्यांना आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे.  त्यादृष्टीने पक्षांची तयारीही सुरू झाली आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी 70 जागांसाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचा निकाल 11 फेब्रुवारीपर्यत घोषित करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आपल्या 70 उमेदवारांची यादी एकाच वेळी जाहीर केली आहे. मात्र कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाने अद्याप त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. आज या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या निवडणूक समित्यांची बैठक सुरू आहे.

70 जागांसाठी 13,750 मतदान केंद्र उभारणार

दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या राज्यांमधील निवडणुका सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने राजकीय पक्ष या राज्यांमध्ये आपली सत्ता यावी यासाठी पुरेपुर प्रयत्न करतात. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी तब्बल 13,750 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी 90 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांना मतदान केंद्रावर येणं शक्य नसेल अशा ज्येष्ठ व्यक्तींसाठी पोस्टाने मतदान करता येणे शक्य आहे. मात्र यासाठी पाच दिवसांपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.

22 फेब्रुवारी रोजी दिल्ली विद्यमान विधानसभा होणार बरखास्त

दिल्लीची विद्यमान विधानसभा 22 फेब्रुवारी रोजी बरखास्त होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज कृभरण्याची सुरुवात झाली आहे. तर 21 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 जागा या आरक्षित असून 58 खुल्या वर्गातील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 11:50 AM IST

ताज्या बातम्या