Home /News /national /

काँग्रेस कार्यकर्ते देशभर ED समोर आंदोलन करणार, कोरोनाची नवी लाट येणार? बंगालमध्ये हिंसाचार TOP बातम्या

काँग्रेस कार्यकर्ते देशभर ED समोर आंदोलन करणार, कोरोनाची नवी लाट येणार? बंगालमध्ये हिंसाचार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 13 जून : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नोटीस दिल्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते देशभरात ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी वर्तवलं आहे. भाजप नेते पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटात तुफान राडा झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादावर पडदा पडला आहे. आमदार भुयार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, लोकल ट्रेनची तोडफोड करण्यात आली आहे. देशविदेशातील घडामोडी अगदी काही मिनिटांत वाचा. काँग्रेस कार्यकर्त्यांचा ईडी कार्यालयासमोर मोर्चा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस दिल्याच्या निषेध म्हणून देशभरात काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर मोर्चा करणार आहेत. 2024 च्या विधानसभेला 170 जागा; चंद्रकांत पाटलांचं नवीन भाकीत '2024 ला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. मग त्यांनी तिन्ही पक्षाने सोबत यावे की, एकट्याने यावे हा त्यांचं प्रश्न आहे. पण लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकितच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी वर्तवलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पंकजा मुंडे समर्थकांचा भाजप कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांना उमेदवारी न देण्यात आल्याने भाजपातील (BJP) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. पंकजा यांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांची आहे. त्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अखेर पवारांच्या मध्यस्थीनंतर 'मविआ'ची गाडी रुळावर राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाल्यामुळे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Independent MLA Devendra Bhuyar) यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. अखेरीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादावर पडदा पडला आहे. आमदार भुयार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर भीषण हल्ला, 2 जण पडले बेशुद्ध पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad fort pune) फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला (Bees attack) केल्याची घटना समोर आली आहे.  या हल्ल्यात 8ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात 2 जण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच 20 हजार टन ऊस शिल्लक सातारा जिल्ह्यात (satara district) अद्याप 20 हजार टन ऊस शिल्लक असताना सर्व कारखान्यांनी मात्र गाळप हंगामाची सांगता केली आहे. (sugarcane farming) वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील 20 हजारांवर टन ऊस गाळपाविना उभा आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस (sugarcane) तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, लोकल ट्रेनची तोडफोड, रेल्वे स्थानकावर हल्ला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर देशभरात आंदोलने केली जात आहे. या वणव्यात पश्चिम बंगालच्या बेथुआडहारी रेल्वे स्थानकाची (Bethuadhari railway station) अतिशय वाईट अवस्था झाली. अनेक प्रवासी जखमी झाले. लोकल ट्रेनच्या काचा फोडल्या. प्रचंड नासधूस, तोडफोड करण्यात आली. या घटनेचा ट्रेनच्या सेवेवरही दुष्परिणाम झाला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. कोरोनाची नवी लाट येणार का? देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत संसर्गाची सुमारे 8.5 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाची चौथी लाट तर येणार नाही ना? अशी भीती अनेकांच्या मनात आहे. यात महाराष्ट्र आणि विशेषकरुन मुंबईत वेगाने रुग्णवाढ होताना दिसत आहे. आता कुठं परिस्थिती पूर्वपदावर येत असताना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची भीती लोकांना सतावत आहे. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: ED, Rahul gandhi, Sanjay raut

    पुढील बातम्या