निवडणूक हरल्यावर EVM च्या नावानं रडते काँग्रेस, जिंकल्यावर निकाल मान्य करते-पंतप्रधान मोदी

"काँग्रेस फक्त ईव्हीएम मशीनच्या बद्दल चुकीची माहिती पसरवत आहे"

News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2018 07:56 PM IST

निवडणूक हरल्यावर EVM च्या नावानं रडते काँग्रेस, जिंकल्यावर निकाल मान्य करते-पंतप्रधान मोदी


तामिळनाडू, 18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपच्या माध्यमातून पुदुचेरी आणि तामिळनाडूमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद झाला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यावर काँग्रेस ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा मुद्दा उचलून धरते आणि ईव्हीएमच्या नावाने गळा काढते पण जिंकल्यावर ईव्हीएम मशीनच्या निकालाचा स्वीकार करते अशी टीका मोदींनी केली.

काँग्रेस फक्त ईव्हीएम मशीनच्या बद्दल चुकीची माहिती पसरवत आहे. निवडणूक जिंकल्यावर मात्र त्यांना ईव्हीएमचा निकाल मान्य असतो असंही मोदी म्हणाले.Loading...

काँग्रेसच्या या व्यवहाराला उत्तर देणे हे लोकशाही मजबूत करणे आहे. लोकशाहीसाठी सूचना आणि जागरूकता महत्त्वाची आहे. आपल्या काँग्रेसच्या या वाईट कृत्याची माहिती लोकांना द्यावी लागणार आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

काँग्रेस वारंवार निवडणूक आयोगावर टीका करत असते. पण याच निवडणूक आयोगाने निवडणुकांमधून निकाल दिला तो आता त्यांना चांगला वाटतोय असा टोलाही मोदींनी लगावला.

=======================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...