'काँग्रेसने काश्मीरमध्ये पेरली दहशतवादाची बीजं, कलम 370 रद्द करणार' - राम माधव

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या कलम 370 वरून राजकारण तापलं आहे. गृहमंत्री अमित शहांनी, नेहरूंनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, असं विधान केलं होतं. आता काश्मीरमधल्या दहशतवादाबद्दल राम माधव यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला जबाबदार धरलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 05:11 PM IST

'काँग्रेसने काश्मीरमध्ये पेरली दहशतवादाची बीजं, कलम 370 रद्द करणार' - राम माधव

नवी दिल्ली, 29 जून : काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या कलम 370 वरून राजकारण तापलं आहे. गृहमंत्री अमित शहांनी, नेहरूंनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, असं विधान केलं होतं. आता काश्मीरमधल्या दहशतवादाबद्दल राम माधव यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला जबाबदार धरलं आहे.

काश्मीरमधलं कलम 370 रद्द करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, असंही राम माधव यांनी म्हटलं आहे.

'काँग्रेसने इतकी वर्षं काय केलं?'

भाजप आणि पीडीपीच्या सरकारमुळेच काश्मीरमधली परिस्थिती चिघळली, असा आरोप विरोधक करतात. त्यावरही राम माधव यांनी उत्तर दिलं. भाजप आणि पीडीपी यांचं युती सरकार अडीच वर्षं सत्तेत होतं. पण काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार इथे अनेक दशकं होतं. त्यांनी इथे काय केलं, असा सवाल त्यांनी केला.

पुणे दुर्घटना: इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 ठार, बिल्डर्सविरोधात गुन्हा

Loading...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी लोकसभेत काश्मीरबद्दल निवेदन दिलं. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिन्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे. काश्मीरमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील, निवडणूक आयोग याची तारीख जाहीर करेल, असंही त्यांनी सांगितलं.

अमित शहांचा काश्मीर दौरा

गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दोन दिवसांचा काश्मीर दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी तिथला सुरक्षा आढावा घेतला. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलही त्यांनी जाणून घेतलं.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढतालढता शहीद झालेले पोलीस अधिकारी अर्शद खान यांच्या कुटुंबीयांचीही अमित शहा यांनी भेट घेतली. सीमेवरच्या हिंसाचारात ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात आली आहे, असंही अमित शहा यांनी संसदेत सांगितलं.

काश्मीरमध्ये विद्युत प्रकल्प उभे करण्यासाठी सरकारने निधी दिला आहे. त्यासोबतच आयआयटी, आयआयएमची उभारणी, पायाभूत संरचना यावर आमचा भर आहे, असं ते म्हणाले.

==============================================================================================

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, इतर 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...