मोदी लाटेत बुडत्या काँग्रेसला वाचवण्यासाठी सोनियांनी दिला हा सल्ला

मोदी लाटेत बुडत्या काँग्रेसला वाचवण्यासाठी सोनियांनी दिला हा सल्ला

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना लोकांमध्ये मिसळण्याचा सल्ला दिला. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून चालणार नाही तर पक्षाचा अजेंडा ठरवावा लागेल, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना लोकांमध्ये मिसळण्याचा सल्ला दिला. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून चालणार नाही तर पक्षाचा अजेंडा ठरवावा लागेल, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

भारतातली लोकशाही धोक्यात आहे आणि जनादेशाचा दुरुपयोग केला जात आहे. अशा स्थितीत रस्त्यावर उतरून लोकांशी संपर्क साधला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या बैठकीत सोनियांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा केली. आर्थिक मंदीमुळे देशात चिंताजनक स्थिती आहे. लोकांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. या सगळ्या गोष्टींकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं असाच सरकारचा प्रयत्न आहे.या परिस्थितीत आपण जनतेशी संपर्क वाढवला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

150 वी गांधीजयंती

2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची 150 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यावरही सोनियांनी चर्चा केली. काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून सोनिया गांधींनी घेतलेली ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे नेते उपस्थित होते. पण राहुल गांधी मात्र बैठकीला हजर नव्हते.

राहुल गांधींची गैरहजेरी

राहुल गांधींची इच्छा असती तर ते या बैठकीला येऊ शकले असते. पण त्यांच्या निकटवर्तियांच्या मते, त्यांनी जे पद सोडलं आहे ते काही दिखाव्यासाठी सोडलेलं नाही. त्यांनी प्रामाणिकपणे हा निर्णय घेतला आहे. त्यांची आवश्यकता असेल तिथेच ते त्यांचा सहभाग नोंदवतील, असंही त्यांनी सांगितलं.

याआधी राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही मिनिटांसाठी सहभाग घेतला होता. याच बैठकीत त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि सोनिया गांधींची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. याच बैठकीत काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर चर्चा होती. तेव्हा राहुल गांधींनी चर्चेत भाग घेतला.

==========================================================================================

न्यूज18 लोकमतच्या स्टुडिओत बोधनकर यांच्या कुंचल्यातून गणराया LIVE VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: September 12, 2019, 8:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading