Elec-widget

काँग्रेसला अमित शहांसारख्या कणखर नेत्याची गरज - नटवरसिंह

काँग्रेसला अमित शहांसारख्या कणखर नेत्याची गरज - नटवरसिंह

काँग्रेसला या पराभवातून बाहेर काढण्यासाठी अमित शहांसारख्या एका कणखर आणि प्रभावी नेत्याची गरज आहे, असं नटवरसिंह यांनी म्हटलं आहे. गांधी परिवाराचे जवळचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री नटवरसिंह यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता गांधी परिवाराचे जवळचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री नटवरसिंह यांनीच आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेसला या पराभवातून बाहेर काढण्यासाठी अमित शहांसारख्या एका कणखर आणि प्रभावी नेत्याची गरज आहे, असं नटवरसिंह यांनी म्हटलं आहे. भाजपच्या संघटनात्मक व्यवस्थापनाची त्यांनी प्रशंसा केली. त्याचसोबत पक्षामधले मतभेद आणि अपयशाबद्दल पक्षाच्या काही बड्या नेत्यांवरही निशाणा साधला.

हे नेते पदावर का?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मोठ्या नेत्यांची नावं घेतली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांच्या मुलाला तिकीट देण्यासाठी आग्रही होते. त्याचबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याही नावांचा उल्लेख करून राहुल गांधींनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या नेत्यांनी आपली मुलं आणि नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी आग्रह धरला पण दुसऱ्या जागांचा विचार मात्र केला नाही, असं राहुल गांधी म्हणाले.त्यावरही नटवरसिंह यांनी मत व्यक्त केलं.

पक्षाच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे बोलूनही हे मुख्यमंत्री अजूनही पदावर का आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता, असंही नटवरसिंह म्हणाले.

Loading...

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जर पक्षाचा नेता काही बोलत असेल आणि त्या गोष्टी बाहेर येत असतील तर त्या नेत्याने स्वत:हून बाहेर पडायला हवं, अशी परंपरा आहे. पण ही परंपरा आता पाळली जात नाही, असंही नटवर सिंह यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी नाही तर कोण?

राहुल गांधींनी जर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागी हे पद कोण सांभाळणार, असा सवालही नटवर सिंह यांनी विचारला. सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्यापैकी कुणीही ही जबाबदारी घेणार नसेल तर मग याजागी कोण येणार हा प्रश्न आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी राजीनामा न देणं हेच योग्य आहे, असं ते म्हणाले.

असं असलं तरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दलचं चित्र एका आठवड्यात स्पष्ट होईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

काँग्रेसची रणनीती चुकली

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची रणनीती चुकली. उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये काँग्रेसने इतर पक्षांशी युती केली असती तर मतांच्या संख्येत तरी भर पडली असती, असं नटवर सिंह म्हणाले.

प्रियांका गांधी यांना निवडणुकीच्या प्रचारात चुकीच्या वेळी उतरवण्यात आलं. प्रियांका गांधींना दोन वर्षं आधी राजकारणात उतरायवला हवं होतं.

काँग्रेसमध्ये नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी, असा आरोप होत असतो.त्यावर 50 वर्षांच्या वर वय असलेल्या नेत्यांना दूर ठेवून तरुणांना संधी दिली पाहिजे, असंही नटवरसिंह यांनी म्हटलं आहे.

================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: congres
First Published: May 30, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...