Article 370, kashmir : अधीर रंजन यांच्या 'सेल्फ गोल'मुळे काँग्रेस अडचणीत, अशी होती सोनियांची प्रतिक्रिया

Article 370, kashmir : अधीर रंजन यांच्या 'सेल्फ गोल'मुळे काँग्रेस अडचणीत, अशी होती सोनियांची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकाला विरोध करत, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नाही असं म्हटलं आणि एकच गदारोळ झाला. हा एक द्विपक्षीय मुद्दा असून संयुक्त राष्ट्र यावर 1948 पासून देखरेख ठेवून आहे, असं ते म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणाऱ्या विधेयकावरून लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला पण आपल्याच सदस्याच्या विधानामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकाला विरोध करत, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नाही असं म्हटलं आणि एकच गदारोळ झाला. हा एक द्विपक्षीय मुद्दा असून संयुक्त राष्ट्र यावर 1948 पासून देखरेख ठेवून आहे, असं ते म्हणाले.

सोनिया झाल्या नाराज

अधीररंजन यांच्या या सेल्फगोलमुळे काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी होऊ लागली. अधीररंजन यांच्या जवळच बसलेल्या यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तर गोंधळात पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्या अधीर रंजन यांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाहीत. सोनिया गांधींनी फक्त मनीष तिवारी यांनी पक्षाची भूमिका योग्य तऱ्हेने मांडली आहे, असं म्हणाल्या. त्यांनी अधीर रंजन यांच्या वक्तव्याचा उल्लेखही टाळला.

'अमित शहांनी धोका दिला' म्हणत माजी मुख्यमंत्री रडू लागले...

गृहमंत्री अमित शहा यांनी अधीर रंजन यांना चांगलंच उत्तर दिलं. काँग्रेस पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग मानत नाही का, असा सवाल करून ते म्हणाले, आम्ही काश्मीरसाठी प्राणांची बाजी लावायलाही तयार आहोत.

काँग्रेसमध्ये मतभेद

सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी अधीर रंजन यांच्यावर खूपच नाराज झाल्या. त्यांनी अधीर रंजन यांची वेगळी भेट घेऊन त्यांना समजही दिली. कलम 370 बद्दल काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. काँग्रेसचे काही युवा नेते या निर्णयाचं समर्थन करत आहेत तर ज्येष्ठ नेत्यांचा मात्र विरोध आहे. जनार्दन द्विवेदी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी या विधेयकाला पाठिंबा देत हे आपलं वैयक्तिक मत आहे, असं म्हटलं आहे.

Article 370 : जल्लोष करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी केली अटक

====================================================================================================

VIDEO : पंतप्रधान मोदींना भारतरत्न देण्याची मागणी; यासह पाहा 4 वाजताच्या टॉप 18 बातम्या

Published by: Arti Kulkarni
First published: August 6, 2019, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading