Kashmir, Artcile 370 : काँग्रेसच्या या नेत्याला एअरपोर्टवरच अडवलं, काश्मीरमध्ये जायला मज्जाव

Kashmir, Artcile 370 : काँग्रेसच्या या नेत्याला एअरपोर्टवरच अडवलं, काश्मीरमध्ये जायला मज्जाव

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी आहे. काश्मीरमध्ये शांतता कायम राहावी यासाठी स्थानिक नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला रविवारी रात्रीपासूनच नजरकैदेत आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 8 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर आता कुणालाही श्रीनगरला जाण्याची परवानगी नाही. श्रीनगरमध्ये जायला मज्ज्वाव असताना काँग्रेसचे काश्मीरमधले नेते गुलाम नबी आझाद मात्र काश्मीरला जाण्याचा प्रयत्न करत होते पण श्रीनगरच्या एअरपोर्टवरच त्यांना अडवण्यात आलं. गुलाम नबी आझाद हे राज्यसभेमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यासोबत काश्मीर काँग्रेसचे प्रमुख गुलाम अहमद मीर हेही होते. या दोघांनाही श्रीनगर एअरपोर्टवरून पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आलं.

Samjhauta Express : 'ड्रायव्हरला पाठवून ट्रेन घेऊन जा,' पाकचा आडमुठ्ठेपणा

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी आहे. काश्मीरमध्ये शांतता कायम राहावी यासाठी स्थानिक नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला रविवारी रात्रीपासूनच नजरकैदेत आहेत. या दोन्ही नेत्यांना हरि निवास गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे.

जम्मूतले नेतेही नजरकैदेत

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे काश्मीरमधल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत. याबद्दल गुलाम नबी आझाद यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, पैसे देऊन तुम्ही कुणालाही तुमच्यासोबत घेऊ शकता. काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करून आणि स्थानिक नेत्यांना अटकेत ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे, याची आठवण गुलाम नबी आझाद यांनी करून दिली. कोणत्याही सरकारने कायदा हातात घेऊन असा निर्णय घेण्याची घटना भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडली आहे, असंही ते म्हणाले.

पोलिसांनी जम्मूमधल्या डोगरा स्वाभिमान संघटन पार्टीचे अध्यक्ष चौधरी लालसिंह यांनाही नजरकैदेत ठेवलं आहे. सरकारच्या कारवाईत पहिल्यांदाच जम्मूमधल्या या नेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

=============================================================================================

भीषण पूरस्थिती : एका बोटीसाठी जीवघेणी चढाओढ; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

Published by: Arti Kulkarni
First published: August 8, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading