Home /News /national /

'या तिघांनाही द्या भारतरत्न', काँग्रेस नेत्याने मोदींना लिहिलं पत्र

'या तिघांनाही द्या भारतरत्न', काँग्रेस नेत्याने मोदींना लिहिलं पत्र

स्वा. सावरकरांना भारतरत्न देऊ, असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यानंतर आता काँग्रेसने शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी केली आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : स्वा. सावरकरांना भारतरत्न देऊ, असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यानंतर आता काँग्रेसने शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. मोहालीमधल्या विमानतळाचं 'शहीद ए आझम भगतसिंग विमानतळ' असं नामकरण करावं, अशी मागणीही मनीष तिवारी यांनी केली आहे. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात बंड पुकारलं, त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. त्यांच्या या त्यागाला अभिवादन करण्यासाठी 26 जानेवारी 2020 ला या तिन्ही शहिदांचा भारतरत्न ने सन्मान करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. 'शहीद ए आझम'किताब मनीष तिवारी यांनी मागणी केली आहे की, या तिघांना शहीद - ए - आझम या किताबाने सन्मानित करावं. 2016 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्याबद्दल माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करण्यात आला होता. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहिदांचा दर्जा कधी देण्यात येईल, असं या RTI मध्ये विचारण्यात आलं होतं. त्यावर गृहमंत्रालयाने उत्तर दिलं, याबद्दचं कोणंतही रेकॉर्ड आमच्याकडे नाही. या उत्तरामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. ========================================================================================= क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Bharatratna, Narendra modi, Savarkar

    पुढील बातम्या