News18 Lokmat

'येडियुरप्पा यांनी भाजप नेत्यांना दिले 1800 कोटी रुपये'

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप नेते येडियुरप्पा यांनी भाजपच्या नेत्यांना 1800 कोटी रुपये दिले, त्यांनी म्हटलंय.

Arti Kulkarni | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 03:37 PM IST

'येडियुरप्पा यांनी भाजप नेत्यांना दिले 1800 कोटी रुपये'

नवी दिल्ली, 22 मार्च : काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप नेते येडियुरप्पा यांनी भाजपच्या नेत्यांना 1800 कोटी रुपये दिले, त्यांनी म्हटलंय. या सगळ्याबद्दल आपल्याकडे पुरावे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तेव्हा स्वत:चं मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांनी भाजप नेत्यांना कोट्यवधी रुपये दिले. याची नोंद एका डायरीमध्येच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कॅरावान मासिकामध्ये आलेल्या एका रिपोर्टचा दाखला देत रणदीप सुरजेवाला यांनी हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्या मंत्र्यांना येडियुरप्पा यांनी पैसे वाटले, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

हे लोक देश चालवतात, असं म्हणत काँग्रेसने एका डायरीचा तपशील दिला आहे. येडियुरप्पा आणि भाजप नेत्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला त्याची नोंद डायरीमध्ये आहे.

या डायरीमधल्या नोंदींनुसार, येडियुरप्पा यांच्याकडे 2 हजार 690 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती पण येडियुरप्पा यांनी भाजपला 1800 कोटी रुपये दिले. त्यावेळी ते कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री होते.

Loading...

या डायरीमध्ये जर काही तथ्य नसेल तर भाजप या सगळ्याची चौकशी का करत नाही, असा सवालही त्यांनी विचारला. हे जर खरं असेल तर हा भाजपच्या भ्रष्टाचाराचा ढळढळीत पुरावा आहे, असा दावा त्यांनी केला. याची चौकशी लोकपालसारख्या यंत्रणांकडूनही करता येते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

याआधी काँग्रेसने भाजपवर राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. पण यामध्ये काहीही संशयास्पद झालेलं नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा काँग्रेसने हा आरोप करून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.यावर भाजप काय उत्तर देतं ते पाहावं लागेल.

============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...