एका काँग्रेस नेत्याकडे 895 कोटींची संपत्ती पण कार नाही

एका काँग्रेस नेत्याकडे 895 कोटींची संपत्ती पण कार नाही

तेलंगणामधले काँग्रेसचे उमेदवार विश्वेश्वर रेड्डी यांच्याकडे तब्बल 895 कोटींची संपत्ती आहे पण या एवढ्या श्रीमंत उमेदवाराकडे स्वत:ची कार मात्र नाही. चंद्राबाबू नायडू आणि जगन रेड्डी यांचाही श्रीमंत उमेदवारांमध्ये वरचा क्रमांक आहे.

  • Share this:

हैदराबाद, 23 मार्च : निवडणुकीमध्ये उमेदवारांना आपली संपत्ती जाहीर करावी लागते. या उमेदवारांकडे किती संपत्ती जमा झालीय याबदद्ल मतदारांनाही उत्सुकता असते. पण काही उमेदवारांची संपत्ती पाहिली की आपले डोळे पांढरे होतात.

असेच एक श्रीमंत उमेदवार आहेत, तेलंगणामधले काँग्रेसचे उमेदवार विश्वेश्वर रेड्डी. त्यांच्याकडे तब्बल 895 कोटींची संपत्ती आहे पण या एवढ्या श्रीमंत उमेदवाराकडे स्वत:ची कार मात्र नाही. एवढी संपत्ती असूनही त्यांच्याकडे कार का नाही याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.

तेलंगणामधल्या चेवेल्ला मतदारसंघातून ते निवडणूक लढवतायत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधल्या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांचाही वरचा क्रमांक आहे.

तेलुगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 574 कोटी तर वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्याकडे 667कोटी रुपयांची संपत्ती आहे.

तेलंगणामधले काँग्रेसचे उमेदवार विश्वेश्वर रेड्डी यांनी मागच्या वेळी तेलंगणा राष्ट्र समितीकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसमध्ये आले. एवढे श्रीमंत उमेदवार काँग्रेसमध्ये आल्याने पक्षाला त्याचा फायदाच होणार, असं बोललं जातंय.

आंध्र प्रदेशमधले कॅबिनेट मंत्री पी. नारायण यांनीही नेल्लोरमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याकडे 667कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते नारायण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मालक आहेत.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधल्या चार नेत्यांची संपत्ती पाहिली तर नेत्यांकडेच सगळी संपत्ती एकवटली आहे की काय, असा प्रश्न पडतो. आता लोकसभेच्या निवडणुकीत श्रीमंत उमेदवाराला मतं द्यायची की विकासकामांना प्राधान्य द्यायचं हे आंध्र आणि तेलंगणातले मतदारच ठरवतील.

====================================================================================

VIDEO: 'शिवज्योत' घेऊन धावले अमोल कोल्हे; म्हणाले.. 'हा जोश असाच टिकणार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading