दुर्योधन, औरंगजेब आणि जल्लाद : मोदींवरच्या टिकेला साध्वींनी दिलं हे उत्तर

दुर्योधन, औरंगजेब आणि जल्लाद : मोदींवरच्या टिकेला साध्वींनी दिलं हे उत्तर

काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी मोदींना औरंगजेबाची उपमा दिली. त्यावर औरंगजेब हा काँग्रेसचाच पूर्वज आहे, असं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे. याआधी प्रियांका गांधी यांनी मोदींना दुर्योधनाची उपमा दिली होती.

  • Share this:

भोपाळ, 8 मे : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मोदींना औरंगजेबाची उपमा दिली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे.

या टिकेला आता भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी उत्तर दिलं आहे. औरंगजेब हा खरंतर काँग्रेसचा पूर्वज आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. संजय निरुपम यांच्याप्रमाणेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदींना दुर्योथनाची उपमा दिली होती. हरियाणामधल्या एका सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

वादग्रस्त वक्तव्य

साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांची वादग्रस्त विधानं खूप गाजत आहेत. मुंबई हल्ल्यातले शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठलं होतं.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याप्रमाणेच संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर संजय निरुपम यांनी स्पष्टीकरणही दिलं. वाराणसीमध्ये कॉरिडॉरमुळे मंदिरांची मोडतोड होते आहे. त्यामुळेच मी मोदींना औरंगजेबाची उपमा दिली, असं संजय निरुपम म्हणाले. नरेंद्र मोदी हे औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत,असं संजय निरुपम म्हणाले होते.

राबडी देवींची टीका

राबडी देवी यांनीही बुधवारी मोदींबद्दल एक ट्विट केलं. प्रियांका गांधींनी PM मोदींचा दुर्योधन म्हणून केलेला उल्लेख चुकीचा आहे. मोदींना दुर्योधन नाही तर जल्लाद म्हटले पाहिजे, असं यात राबडींनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, त्यांनी (प्रियांका) दुर्योधन म्हणून चूक केली. खरंतर त्यांनी दुसरी भाषा बोलली पाहिजे. ते तर जल्लाद आहेत, जल्लाद. जे न्यायधीशांची पत्रकारांना मारून टाकतात, त्यांचे अपहरण करतात. अशा व्यक्तीचे मन आणि विचार क्रूर असतील.

काँग्रेसवर पलटवार

आता साध्वींनी औरंगजेबाचं नाव वापरून काँग्रेसवरच पलटवार केला आहे. याआधी साध्वींच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून त्यांच्यावर 72 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली होती.

भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत.

First Published: May 8, 2019 05:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading